Kitchen Jugaad : स्वयंपाक ही एक कला आहे. ही कला अवगत करणे काही सोपी गोष्ट नाही. स्वयंपाक शिकताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घेणे देखील महत्त्वाचे असते. ज्या व्यक्तीला स्वयंपाक करताना या छोट्या छोट्या गोष्टी समजतात तो उत्तम स्वयंपाक बनवू शकतो. स्वयंपाक करताना अनेक छोट्या-मोठ्या ट्रिक असतात ज्या वापरून जेवणाची चव वाढवता येते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक ट्रिक सांगणार आहोत जी तुम्हाला नक्की उपयूक्त ठरेल.
स्वयंपाक करताना प्रत्येकाच्या आवडी निवडी आणि सवयी लक्षात घेऊन त्यानुसार जेवण बनवावे लागते. अनेकदा लहान मुले काही गोष्टी खात नाही अशा वेळी काही ना काही करून आईला त्याला तो खाऊ घालते. त्यासाठी महिला काही ना काही जुगाड शोधून काढतात. आजकाल तेल किंवा तूप खाताना लोक खूप विचार करतात. अनेकांना तेल किंवा तुपाचा वासही आवडत नाही. अशा वेळी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला प्रश्न पडतो की, तेलाचा वास न येऊ देता जेवण कसे बनवावे? काळजी करू नका आज तुम्हाला आम्ही हीच ट्रिक सांगणार आहोत. तुम्हालाही तेलाचा वास आवडत नसेल तर ही ट्रिक वापरू शकता.
हेही वाचा – गॅसवर लाटणे गरम करा अन् मग लाटा पोळ्या…पाहा हटके जुगाडची कमाल!
हिवाळ्यात बरेच लोक मोहरीच्या तेलामध्ये स्वयंपाक तयार करतात कारण आरोग्यासाठी चांगले मानले जाते. ज्यांना मोहरीचे तेल खाण्याची सवय नसते त्यांना मोहरीच्या तेलाचा वास आवडत नाही. अशा वेळी तुम्ही मोहरीच्या तेलात कोणतीही भाजी करताना ही ट्रिक वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊ या सोपी ट्रिक
हेही वाचा – अंड्याचे कवच कचरा समजून फेकू नका! असा करा त्याचा पुन्हा वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक
मोहरीच्या तेलाचा वास येऊ नये यासाठी वापरा ही ट्रिक
- सर्व प्रथम एका कढईत मोहरीचे तेल गरम होऊ द्या.
- तेलात भाजी फोडणी देण्यापूर्वी थोडसे गरम पाणी घेऊन त्यात मीठ विरघळवा.
- आता मीठ असलेले गरम पाणी कढईतील तेलात टाका आणि कढईवर झाकण ठेवा.
- असे केल्याने मोहरीच्या तेला वास येणार नाही आणि जेवणाची चव देखील वाढेल.
हेही वाचा – तुम्हाला रेवडी खायला आवडते का मग ‘हा’ व्हायरल व्हिडीओ नक्की पाहा; आयुष्यात पुन्हा कधीही
युट्युबवर Maa, yeh kaise karun? नावाच्या चॅनलवर ही ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक उपयूक्त आहे की नाही ते तुम्ही स्वत: वापरून ठरवा.