Healthy Food: प्रत्येकाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायची इच्छा असते. आपण दिवसभरात जे काही खात असतो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे खाण्याच्या योग्य सवयी लहानपणापासूनच ठेवल्या पाहिजेत. आज आपण अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल बोलणार आहोत, जे सर्वात आरोग्यदायी मानले जातात. हे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. या गोष्टींचा आहारात समावेश केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहाल आणि दीर्घायुष्य जगाल.

डाळ

प्रत्येक भारतीयांच्या घरात डाळ बनवली जाते. डाळ आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानली जाते. डाळींमध्ये फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. तुम्ही रोज डाळ खाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला अधिक पोषण मिळेल.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
Diwali faral recipe garlic sev lasun shev recipe in marathi lasun shev easy recipe
२ कप बेसन वापरून सोप्प्या पद्धतीने बनवा कुरकुरीत लसूणी शेव; फराळाची मजा वाढवेल ‘लसूण शेव’
puri making tips
सणासुदीला टुमदार, लुसलुशीत पुरी बनवायची आहे? ‘या’ महत्त्वाच्या टिप्स करा फॉलो

( हे ही वाचा: तुमच्या वयानुसार शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी किती असायला हवी? हृदयासाठी ‘ही’ पातळी ठरू शकते धोकादायक)

लिंबू

लिंबू हे अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि जगातील सर्वात आरोग्यदायी फळांमध्ये त्याची गणना केली जाते. लिंबू शरीरातील सर्व घाण काढून टाकण्यास मदत करते. लिंबू व्हिटॅमिन सी चा देखील एक चांगला स्रोत आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. त्यामुळे लिंबाचा आहारात नक्की समावेश करावा.

लसूण

अनेकांना लसूण आवडत नाही पण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या जेवणात लसूण अनेकदा वापरले जाते. लसूण शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करू शकतो. याशिवाय कोलेस्ट्रॉलची पातळी आणि बीपी नियंत्रणात ठेवते. लसणामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म देखील असतात.

( हे ही वाचा: Side Effects of Paneer: ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नका पनीर; आरोग्यासाठी ठरू शकते घातक)

बीट

बीटरूट हे आरोग्यदायी कंदमुळं आहे. बीटरूटचे सेवन सॅलड म्हणून करता येते. त्याचे औषधी गुणधर्म शरीर निरोगी ठेवतात. बीटरूट मेंदूला तीक्ष्ण करते, बीपी कमी करते. त्यात फोलेट, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असतो.