Adnan Sami Weight loss Secret: पद्मश्री विजेते अदनान सामीने अलीकडेच २३० किलोवरून ७५ – ८० किलोपर्यंत वजन कमी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तब्बल १२० किलो वजन कमी करणे आणि ते सुद्धा अवघ्या सहा महिन्यात, हे काही खाऊचे काम नाही. त्याने अलीकडेच या प्रवासाबद्दल माहिती शेअर केली. एकामुलाखतीत, एकेकाळी २३० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या अदनान सामीने वजन कमी करण्याच्या ध्येयाची माहिती दिली केली. २००६ मध्ये, डॉक्टरांनी त्यांना अल्टीमेटम दिला होता की, “अतिवजनामुळे तू फक्त सहा महिने जगू शकतो. वजन कमी करणे जीवन किंवा मृत्यूचा प्रश्न आहे” असे सांगितल्यावर त्याने अखेरीस डाएट करण्याचा निर्णय घेतला होता.
अदनान सामीने सांगितले की, “मी माझ्या बालपणी फिट आणि बारीक होतो. मी रग्बी, स्क्वॅश, घोडेस्वारी आणि पोलो खेळायचो. मानसिकदृष्ट्याही मी माझे वाढलेलं वजन स्वीकारत नव्हतो, त्यामुळेच शेवटी मी ते कमी केले. मला जीवनात वाईट गोष्टी बदलायच्या आहेत, त्यात हे एक पाऊल आहे” या ध्येयाच्या दिशेने जाताना अदनान सामीने जीवनशैलीत नेमके काय बदल केले हे पाहूया..
1) TOI च्या माहितीनुसार, अदनान सामीला वजन कमी करण्यासाठी चपाती, भात, साखर आणि तेल हे चार पदार्थ सोडावे लागले.
2) यासाठी भाकरी, तांदूळ, साखर, तेल सोडून सामी यांनी हाय प्रोटीनयुक्त डाएट स्वीकारले आहे.
3) हाय प्रोटीन डाएटमुळे स्नायू भक्कम होण्यास मदत होते तसेच पोट सुद्धा जास्त वेळ भरलेले राहते. हाय प्रोटीन डाएटमध्ये मासे, चिकन, बदाम, बीन्स, अंडी आणि कडधान्ये यांचा समावेश असतो.
4) अदनान सामी सांगतो की, जेवण काय व कधी करावे यासह किती अन्नाचे सेवन करावे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असताना सामी यांनी अन्न जास्त प्रमाणात खाणे टाळले.
हे ही वाचा<< भारती सिंहने खाण्यावर प्रचंड प्रेम असताना १५ किलो वजन कमी कसं केलं? फॅन्सना सांगितले ‘हे’ ४ सिक्रेट फंडे
याशिवाय, अदनान सामीने आपल्या वेटलॉसचे श्रेय आपल्या न्यूट्रिशनिस्टला दिले. ते सांगतात की, आपण वजन कमी करण्याचे ध्येय न ठेवता फिटनेसचे ध्येय ठेवायला हवे तसेच तुम्ही प्रत्येक पायरीवर विचारांना लांब ठेवून कृतीकडे लक्ष द्यायला हवे. तसेच आपणही लक्षात घ्या की प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे आहे त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास घरगुती उपायांसह तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास काहीच हरकत नाही.