चिया सीड्स मुळातलं अमेरिका आणि मेक्सिकोमधील आहे. उशीरा का होईना परंतु आरोग्यासाठी उपयुक्त म्हणून बरीच लोकप्रियता चिया सीड्स याला मिळाली आहे. चिया ही फुलांची वनस्पती, साल्व्हिया हिस्पॅनिकापासून मिळालेलं बीज आहे. चिया बियाण्यांनी बर्याच देशांमध्ये आपलं स्थान बनवलेलं आहे आणि आता भारतातील बर्याच घरांमध्ये ते परिचित होत आहेत. त्याच्या बर्याच आरोग्य फायद्यांबद्दल ते मनुष्यासाठी एक वरदान झाले आहे. जास्तीत जास्त लोक त्यांच्या आहारात चिया सीड्स (chia seed) वापरतं आहेत. काही लोक चिया सीड्सला सुपरफूड देखील म्हणतात.
छोट्या दिसणाऱ्या चिया सीड्स हे गुणांमध्ये उत्तम खजिना आहे. हे स्वस्थ राहण्याबरोबरच अनेक आजारांपासून आपला बचाव देखील करतात. चिया बियाणे लहान काळे बियाणे आहेत. अनेक लोकांचा समज आहे की, चिया बीज म्हणजेच सब्जा. परंतु तसं काही नाही. सब्जा व चिया बीज मध्ये फरक आहे, दोन्ही वेगवेगळ्या बिया आहेत. फक्त दोन्ही बिया आहेत एवढंच साम्य. सब्जा हा जास्त काळसर असतो. तर चिया बीज (Chia Seeds) राखाडी ते काळसर रंगाच्या असतात. चला तर मग पाहुयात चिया सीड्सचे फायदे व अतिवापरामुळे होणारे नुकसान
1.केसांसाठी खूप उपयुक्त
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी, आपण त्यांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यांना केवळ चांगले शॅम्पू आणि कंडिशनरने धुणेच महत्वाचे नसून, आपल्या खाण्याच्या सवयीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. वास्तविक, चिया सीड्स (chia seed) मध्ये व्हिटॅमिन बी असतं. जे केसांसाठी खूप महत्वाचा असतो. म्हणूनच, जर तुम्ही चिया सीड्सचे सेवन केले, तर याद्वारे तुमच्या केसांना व्हिटॅमिन बीचा पुरवठा मिळतो. यामुळे केस निरोगी व दाट राहतील, तसेच डोक्यातील कोंडा आणि केस गळती पासून आपली सुटका होण्यास मदत होईल.
2. त्वचेसाठी फायदेशीर
चिया सीड्सचं सेवन त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात उपस्थित अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण आपल्या त्वचेवर वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते. तसेच त्वचेमध्ये कडकपणा निर्माण करते. त्वचेशी संबंधित अनेक रोग टाळण्यासाठी हे सीड अँटिऑक्सिडेंट सामग्रीमुळे आपली त्वचा संरक्षण करण्यात सक्रिय भूमिका बजावू शकते. तर आपण चांगली त्वचा मिळविण्यासाठी चिया सीड्स नियमितपणे घेऊ शकता.
3. हाडे मजबूत करण्यासाठी उपयोगी
आपल्या सर्वांना हे माहित आहे की, हाडांच्या मजबूती करिता कॅल्शियम हा सर्वात महत्वाचा घटक आहे. चिया सीड्स हे देखील कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्त्रोत मानले जाते आणि आपण हाडांच्या आरोग्यासाठी याचे सेवन करू शकता. चिया बियाणे दुधासह सेवन केल्याने तुम्हाला याचा फायदा मिळतो.
4. स्मरण शक्ती चांगली होते
आजकाल, युवकांमध्ये स्मरणशक्ती कमकुवत होण्याची समस्या आहे, याचे कारण अयोग्य खाणं पिणं आणि वाईट सवयी आहेत. तसेच धूम्रपान आणि मद्य याचे अतिसेवन, स्मरण शक्ती कमी करते. चिया सीड्स स्मरण शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करते. जर आपण नियमितपणे चिया सीड्सचे सेवन केले तर, आपली स्मरणशक्ती कुशाग्रा होण्यास मदत होईल.
5. वजन कमी करण्यास मदत होते
शरीराचे वजन वाढल्याने आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्यां उद्भवू शकतात. ज्यामध्ये टाईप दोन मधुमेह (type-2 diabetes) होण्याचा धोका सर्वाधिक असतो. म्हणूनच, लठ्ठपणाची समस्या टाळण्यासाठी चिया सीड्सचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरेल, कारण भूक नियंत्रित करून वजन कमी करण्याचे गुणधर्म त्यात आहेत. जर आपण दररोज हे सेवन केले तर, यामुळे भूक कमी होईल जेणेकरून आपण कमी प्रमाणात अन्न खाऊ, त्यामुळे आपले वजन कमी होईल.
चिया बीजचा अतिवापरामुळे होणारे नुकसान
1. अॅलर्जी होणे – चिया बियाण्यापासून एलर्जीची शक्यता कमी आहे. परंतु ज्या कोणालाही कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीचा संशय असल्यास त्याने सर्वप्रथम चिया बी सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
2. पोट खराब होणे – चिया बियाण्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे. काही जणांना याचा त्रास होऊन पोट बिघडण्याची शक्यता असते.
3. कमी रक्तदाब – ओमेगा -3 फॅटी ऍसिड चिया बियाण्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. जे रक्तदाब सामान्य करण्यात मदत करतात. परंतु चिया बियाणे जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. ज्यांना रक्तदाब कमी असण्याची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच चिया बीचे सेवन करावे.
4. घशात अडकणे – चिया बियाचे सेवन करताना नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा. भरपूर खाण्याने ते आपल्या घशात अडकण्याची व त्यामुळे श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते.
आमची विनंती आहे की, यामधील कोणत्याही प्रकारचे उपाय वापरण्याअगोदर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे! या लेखाचा हेतू माहिती देणं असून प्रसार करणे हा नाहीये.