Joint Family : कुटुंब ही एक अशी पद्धत आहे, जिथे एकत्रित राहून अनेक नाती जपली जातात. एकत्र कुटुंब पद्धतीत एकाच छताखाली सर्व प्रेमाने राहतात, यालाच इंग्रजीमध्ये जॉइंट फॅमिली म्हणतात.
दिवसेंदिवस शिक्षणासाठी किंवा नोकरी-व्यवसायासाठी मुले घराबाहेर पडतात; ज्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत कमी होताना दिसत आहे. काही लोक स्वत:च्या आवडीनुसार कुटुंबापासून विभक्त होऊन एकटे राहतात.
सध्याच्या धावपळीच्या जगात जॉइंट फॅमिलीमध्ये राहण्यासाठी अनेक लोक टाळाटाळ करतात, पण तुम्हाला जॉइंट फॅमिलीचे फायदे माहिती आहेत का? जर हे तगडे फायदे जाणून घ्याल, तर तुम्ही कधीही एकटे राहणार नाही.
सहकार्य
जॉइंट फॅमिलीमध्ये राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना एकटा करावा लागत नाही. कोणत्याही लहान मोठ्या अडचणीच्यावेळी कुटुंबातील लोक बरोबर असतात आणि लवकरात लवकर समस्या सोडवता येते.
हेही वाचा : अरेंज मॅरेजमध्येही मिळेल लव्ह मॅरेजसारखा आनंद, ‘या’ खास टिप्स जाणून घ्या; कोणीही म्हणेल जोडी असावी तर अशी…
कमी जबाबदाऱ्या
एकटं राहण्याच्या नादात अनेकदा लोकं जबाबदारीचा विचार करत नाही, पण जॉइंट फॅमिलीमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाते; ज्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीवर जबाबदाऱ्यांचा भार येत नाही आणि व्यक्ती तणावमुक्त राहतो.
आर्थिक समस्या उद्भवत नाही
अनेक लोकांना असे वाटते की, जॉइंट फॅमिलीमध्ये राहिल्यामुळे खर्च वाढतो, पण खरं पाहायचं तर जॉइंट फॅमिलीचा खर्च एकटं राहणाऱ्या कुटुंबापेक्षा कमी असतो. जर कुटुंबात अन्य सदस्यही कमावणारे असतील तर पैशांची चणचण भासत नाही आणि घर आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहते.
मुलांना चांगली शिकवण मिळते
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आई -वडील दोघेही नोकरी करत असतील तर मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अशावेळी मुलं वाईट संगतीत पडू शकतात, पण जॉइंट फॅमिलीमध्ये आई-वडील जरी नोकरीवर गेले, तरी घरात आजी-आजोबा किंवा अन्य सदस्य असतात, जे मुलांकडे लक्ष देऊ शकतात आणि त्यांच्याकडून मुलांना चांगली शिकवण मिळू शकते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)