बालकांनी नियमितपणे अॅरोबिक व्यायाम केल्याने त्यांच्या स्मृतीला चालना मिळते त्याचबरोबर मेंदुच्या आरोग्यासाठी हितकारक ठरत असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे.
बोस्टन वैद्यकीय विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, शरीरातील विशिष्ट हार्मोन्स व्यायाम केल्याने सुदृढ होतात. याची स्मृतीत सुधारणा होण्यासाठीही मदत होते. त्यामुळे व्यायाम आणि मेंदु यांचे परस्पर नाते असल्याचेही स्पष्ट होते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे मेंदुच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते असेही संशोधकांचे म्हणणे आहे.
मेंदुच्या कार्यप्रणालीत स्मृती आणि शिकण्याची प्रवृत्ती यांचा ताळमेळ साधणाऱया हिप्पोकॅम्पस या महत्वाच्या दुव्याला बळकट करण्याचे काम अॅरोबिक व्यायामातून होते. त्यामुळे बालकांनी नियमितपणे अॅरोबिक व्यायाम करावा असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.   

Story img Loader