एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानंतर आता अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपही महाग होणार आहे. अॅमेझॉन प्राइम भारतात पाच वर्षांपूर्वी आले होते. अल्पावधीत अनेकजण अॅमेझॉन प्राइमचे मेंबर झाले आहेत. मनोरंजन, चित्रपट, वेब सीरिज यामुळे तरुणांमध्ये हे अॅप लोकप्रिय आहे. मात्र आता अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप ५० टक्क्यांपर्यंत महाग होणार आहे. वाढीव रुपये १३ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार आहेत. सध्या ९९९ रुपये वार्षिक मेंबरशिप असलेलं पॅकेज १,४९९ रुपये होणार आहे. वार्षिक सभासदत्वाची किंमत ५०० रुपयांनी वाढणार आहे. मासिक आणि त्रैमासिक सब्सक्रिप्सनवरही याचा परिणाम होईल. नव्या अपडेटनंतर अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपसाठी ९९९ रुपयांच्या पॅकची किंमत १,४९९ रुपये असेल. त्याची वैधता १२ महिने आहे. त्याच वेळी, ३२९ रुपयांच्या तिमाही प्लॅनची किंमत ४५९ रुपये असेल आणि १२९ रुपयांच्या मासिक प्लॅनची किंमत १७९ रुपये असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा