निरोगी आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप गरजेची असते. मात्र, हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोप योग्य प्रमाणात होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. रात्री झोपतांना आपण कोणत्या बाजूला झोपावं ? किंवा कोणत्या स्थितीत झोपणे योग्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया रात्री झोपताना कोणत्या बाजूने झोपणं अधिक चांगले आहे, जेणेकरून अन्न पचन नीट होईल आणि आपले शरीरही निरोगी राहील.
काय म्हणतात, सहयोगी सल्लागार डॉ. मनिरा धस्माना
डॉ. मनिरा धस्माना यांनी डाव्या बाजूला झोपण्याचे विविध फायदे सांगितले आहेत. त्यांच्या मते, आपले पचलेले अन्न आपल्या लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात सहजपणे हस्तांतरित करते. डाव्या बाजूला झोपल्याने गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लक्स डिसीज सारख्या विकारांना देखील प्रतिबंध होतो, ज्यामुळे ढेकर येणे आणि छातीत जळजळ होते.
वरिष्ठ सल्लागार डॉ. महेश गुप्ता यांच्या मते–
“पोट शरीराच्या डाव्या बाजूला अन्ननलिकेच्या खाली आहे. जेव्हा आपण डाव्या बाजूला झोपतो तेव्हा पोटातील आम्ल गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध पाचन तंत्रात वाढणे कठीण होते. दुसरीकडे, गुरुत्वाकर्षण पोटात आम्ल ठेवते, संभाव्यतः छातीत जळजळ आणि अपचनाची लक्षणे कमी करते.
आणखी वाचा : ‘या’ ब्रेडचा दररोजच्या आहारामध्ये करा समावेश; वजन कमी करण्यासाठी ठरतील फायदेशीर
डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे
१. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना ब्लडप्रेशरची पातळी कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो.
२. मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
३. सांधेदुखीच्या त्रासात थोडा आराम मिळू शकतो.
४.डाव्या कुशीवर झोपल्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. जर तुम्ही अनेकदा पोट खराब होणे किंवा पचन न होणे यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पचनक्रियेत बरीच सुधारणा दिसून येते.
५. छातीत जळजळ, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.