फळांचे सेवन केल्याने आपल्याला फायदा होतो हे आपल्याला लहान पणापासून शिकवले आहे. यामध्ये पौष्टीक गुणधर्म असल्याचे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. परंतु फळे खाण्याची एक योग्य पद्धत आहे. जर आपण त्या पद्धतीने फळांचे  सेवन केले तर आपल्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. या पैकी एक म्हणजे फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे? आपले आजी-आजोबा आपल्याला नेहमी सांगतात की फळांचे सेवन केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. कोणती फळं खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये हे आज आपण जाणून घेणार आहोत…

– फळं खाल्याने आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश असणे गरजेचे आहे.

आणखी वाचा : किसून की ठेचून? आल्याचा कडक चहा बनवण्याची योग्य पद्धत

– परंतु फळं खाल्यानंतर पाणी पिण्याबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या जातात. फळं खाल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. आपले मोठे आपल्याला फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिऊ नका असे सांगतात. सगळ्यांना प्रश्न आहे की यात किती सत्य आहे?

फळे खाल्ल्यानंतर आपण खरोखरच पाणी प्यावे की नाही?

– यामागे बरीच कारणे आहेत. फळांमध्ये साखर आणि यीस्ट असते. जेवण केल्यानंतर त्याला पचनवण्यासाठी पोटात अॅसिड तयार होते. तर, फळं देखील एका प्रकारचे अॅसिड तयार करतात आणि जर तुम्ही पाणी पिलात तर तुमच्या पोटात अॅसिडचे प्रमाणे वाढेल.

आणखी वाचा : पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा, पोळी फुलल्याशिवाय राहणार नाही

– फळांचे सेवन केल्यानंतर पाणी प्यायल्याने पचन प्रक्रिया मंदावते. पोटात अन्न पचन्यासाठी तयार होणाऱ्या अॅसिडीची निर्मिती कमी होते. पोटाशी संबंधीत अनेक समस्या देखील उद्भवतात. फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिल्यास अॅसिडीटी होते. एवढंच नाही तर छातीत जळजळ होऊ शकते.

आणखी वाचा : दिवसा की रात्री? आयुर्वेदानुसार डाळीचे सेवन कधी करावे? जाणून घ्या चांगल्या आरोग्यासाठी आहाराची योग्य वेळ

– फळांचे सेवन केल्यानंतर कधी पाणी प्यायला पाहिजे? जर तुम्ही फळं खाल्ली तर त्याच्या एका तासानंतर पाणी प्या. यामुळे तुम्हाला कोणत्याही समस्या होणार नाही.