मशरूम ही एक शाकाहारी भाजी आहे. बाजारात गेल्यावर तुम्हाला मशरूमचे अनेक प्रकार पाहायला मिळतील. विविध आकारांचे, रंगांमध्ये मशरूमचे प्रकार असतात. तुम्ही मशरूमची भाजी अगदी तुम्हाला हवी अशा पद्धतीने बनवू शकता. मशरूमचा वापर तुम्ही अगदी कढी बनवताना देखील करू शकता. एवढेच नव्हे तर मशरूमचा आपल्याला आवडणार्या पिझ्झावर टॉपिंग म्हणूनही वापर करू शकता. मशरूम एक अष्टपैलू म्हणून संबोधले जाते. कारण मशरूम अशी भाजी आहे जी अनेक विविध भाज्यांमध्ये वापरुन तसेच मशरूमचे विविध पदार्थ बनवून त्यांचा आहारात समावेश करू शकता.
तुम्हाला माहिती आहे का मशरूम हे स्वादिष्ट तर आहेच त्याच बरोबर आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
शेफ संजीव कपूर यांनी अलीकडे इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मशरूम आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे. मशरूम खाण्यामुळे आपल्या आरोग्याला होणार्या फायद्याबद्दल माहिती त्यांनी या पोस्टद्वारे दिली आहे.
View this post on Instagram
मशरूमचे फायदे :-
– वजन कमी करण्यासाठी तुम्ही मशरूमचा आहारात समावेश करावा. कारण मशरूममध्ये कॅलरी कमी असतात.ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही.
– मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आजरांपासून बचाव देखील होतो.
– मशरूममध्ये अधिक प्रमाणात प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, आणि जीवनसत्वेही मोठ्या प्रमाणात मिळतात. ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणार्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे.
– मशरूम हे खूप सार्या प्रकारामध्ये येतात.
मशरूमचे हे फायदे जाणून घेतल्या नंतर नक्कीच तुमच्या जेवणात मशरूमचा समावेश करा.