How To Deal With Layoff Anxiety: गुगल ते अ‍ॅमेझॉन आणि शेअरचॅट ते स्पॉटीफाय अशा अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये कर्मचारी कपात करणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक दिवशी यात नव्या टेक कंपनीचा समावेश होतो. या वातावरणामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीबाबत काळजी वाटणे साहजिक आहे. यातच अनेक कर्मचारी ‘लेऑफ एंग्जायटी’चा सामना करत आहे.

तज्ञांच्या मते गेल्या काही दिवसांमध्ये एंग्जायटी, तणावाचा सामना करणाऱ्या टेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. भविष्याची चिंता, उत्पन्नाचा मार्ग बंद होण्याची भीती, महिन्याचा खर्च कशावर चालणार याची चिंता या आणि अशा बऱ्याच गोष्टींची चिंता या कर्मचाऱ्यांना सतावत आहे. जानेवारी २०२३ मधील आकडेवारीनुसार दररोज जवळपास ३००० कर्मचारी त्यांची नोकरी गमावत आहेत. या समस्येमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असुन, यापासून वाचण्यासाठी काही टिप्स उपयोगी ठरू शकतात. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

‘लेऑफ एंग्जायटी’पासून वाचण्याचे उपाय

  • स्वतःसाठी एक रुटीन तयार करा आणि त्यानुसार सर्व कामं करण्याचा प्रयत्न करा. यामुळे चिंता करायला लावणाऱ्या विचारांपासून दुर राहण्यास मदत मिळेल.
  • अशा लोकांशी संपर्क साधा जे तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि तुमच्या इमोशनल ब्रेकडाउनमध्ये तुम्हाला मदत करू शकतील.
  • शारीरिक व्यायामांसाठीही वेळ द्या. अशावेळी तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी असणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक व्यायाम करा, यामुळे शारीरिक ऊर्जा तुम्हाला सकारात्मक राहण्यासाठी मदत करेल.
  • व्यायामाबरोबर तुम्ही कोणते अन्नपदार्थ खात आहात याकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरासाठी आवश्यक पोषकतत्व पुरवणाऱ्या अन्नपदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत मिळेल.
  • मेडिटेशन करा, यामुळे मानसिक शांतता मिळवण्यास मदत मिळेल.
  • स्वतःच्या भावनांचा स्वीकार करा, तुम्हाला जे काही वाटत आहे त्याचा त्रास करून न घेता त्याचा स्वीकार करून, स्वतःवर विश्वास ठेऊन प्रत्येक दिवसाच्या कामाला सुरूवात करा. यामुळे सकारात्मक विचार वाढण्यास मदत मिळेल.

Story img Loader