ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात किमान तीनदा शनि साडेसातीला सामोरं जावं लागतं. शनीचा हा काळ सर्वांसाठीच वाईट असेलच असे नाही. साडेसाती ही काही लोकांसाठी वरदान ठरते. आता कोणत्या व्यक्तीवर शनी साडेसातीचा प्रभाव कसा पडेल?, हे त्या व्यक्तीच्या कुंडलीवर अवलंबून असते. मंद गतीमुळे शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. अडीच वर्षांनंतर २९ एप्रिल २०२२ रोजी शनि आपली राशी बदलणार आहे.

२०२२ या वर्षात शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनीचा प्रवेश तब्बल ३० वर्षांनी होणार आहे. शनी या राशीचा अधिपती ग्रह आहे. कुंभ राशीतील शनीचे संक्रमण काही राशींसाठी लाभदायी असेल, तर काहींसाठी हा काळ अडचणी वाढवणारा असेल. शनीच्या राशी बदलामुळे धनु राशीच्या लोकांना शनि साडेसातीपासून मुक्तता मिळेल. या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. शनीच्या साडेसातीमुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय मीन राशीच्या लोकांना शनी साडेसाती सुरू होणार आहे. या राशीच्या लोकांपैकी ज्यांच्या कुंडलीत शनि शुभ स्थितीत नाही, त्यांना या काळात खूप सावध राहावे लागेल. विशेषत: आर्थिक बाबींबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल. धनहानी होण्याची दाट शक्यता आहे. तब्येत बिघडू शकते. एकट्याने प्रवास करणे टाळा. मीन राशीव्यतिरिक्त २०२२ मध्ये मकर आणि कुंभ राशीच्या लोकांचीही शनि साडेसाती असणार आहे.

Margshirsha 2021: मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय; देवी लक्ष्मीची राहील कृपा

शनि ढैय्यातून मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना त्यातून मुक्ती मिळेल. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची ही दशा सुरू होईल. शनीच्या दशेचा कालावधी अडीच वर्षांचा असतो.

Story img Loader