देशभरात टोमॅटोचा भाव वाढले असतानाचा आता आले महाग झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या आल्याचा भाव ३०० रुपये किलोवर पोहचला आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये आल्याचा भाव ४०० रुपये किलोवर पोहचला आहे. टोमॅटोप्रमाणेच आलं ही आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ आहे. त्यामुळे गृहिणींना आता आल्याशिवाय स्वयंपाक करावा लागतोय का? याची चिंता सतावत आहे. काळजी करू नका आम्ही तुम्हाला यासाठी मदत करणार आहोत. तुम्ही घरच्या घरी आता आले तयार करून वापर शकता. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी आले कसे लावावे हे सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरी परसरदार किंवा मोकळी जागा असेल तर आले कसे लावावे?

१) प्रथम माती मोकळी करुन घ्या.
२) जमीन उकरून, त्यात पालापाचोळा शेणखत घालून पुन्हा माती ओढून वाफा तयार करावा.
३) जून महिन्यात मोड आलेल्या आल्याचे एक किंवा अर्ध्या इंचाचे तुकडे करून सहा इंचाच्या अंतराने लावावे.
४) त्याला पालवी फुटली किंवा पाणे दिसू लागली आली की त्याला परत माती घालावी.
५) पावसाळा संपला की दोन-चार दिवासांनतर फेब्रुवारीपर्यंत पाणी घालावे. छान वास असलेले आले तयार होते.

माती मोकळी राहिली तर आले वाढते आणि हे वर्षभरसुद्धा फ्रिजमध्ये राहते.

२) आले घराच्या कुंडीत कसे लावावे

१)आले लावण्यासाठी कुंडी अगदी छोटी नसावी.
२) कुंडीत तळाला नारळाच्या शेंड्या टाकाव्यात, पाला-पाचोळ्याचा थर लावावा. गांडूळ खत उपलब्ध असेल तर तेही घालावे आणि वर मातीने कुंडी भरावी.
३) १ फुटाचा व्यास असेल तर १०/ १५ कोंब आलेले आल्याचे तुकडे गोलाकार लावाले.
४) माती कोरडी वाटली तर थोडे थोडे पाणी घालावे.
५) ४/ ५ महिन्यांनी आले घरच्या वापराला मिळायला लागेल.
६) वाळलेले आले काढून घेऊन रोप पुन्हा लावता येते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After tomatoes now ginger become expensive how to plant ginger at home learn this easy method snk
Show comments