Age Gap Relationship : प्रेमाला वयाचं बंधन नसते असे आपण अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल. दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्यातील वयाचं अंतर तितकं महत्त्वाचं वाटत नाही; पण खरंच याचा नात्यावर परिणाम होतो का? हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

नात्यात दोन व्यक्तींमध्ये खूप जास्त वयाचं अंतर असणे, यालाच ‘एज गॅप रिलेशनशिप’ म्हणतात. या ‘एज गॅप रिलेशनशिप’चे चांगले-वाईट असे दोन्ही परिणाम दिसून येतात. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Mother Play Aaj Ki Raat On harmonium And Son dancing
Video: आई-मुलाची जोडी इन्स्टाग्रामवर व्हायरल! ‘आज की रात’ गाण्यावर चिमुकल्याचा जबरदस्त डान्स; ठुमके, हावभाव पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस

‘एज गॅप रिलेशनशिप’

एज गॅप रिलेशनशिप म्हणजे जेव्हा नात्यात पुरुष किंवा महिला त्यांच्या पार्टनरपेक्षा वयाने खूप जास्त मोठे असतात, म्हणजेच दोन व्यक्तींमध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त अंतर असेल तर असे नाते ‘एज गॅप रिलेशनशिप’ म्हणून ओळखले जाते. अशा नात्यात एक जोडीदार वयाने मोठा असल्यामुळे खूप चांगला समजूतदारपणा दिसून येऊ शकतो; पण त्याबरोबरच एकमेकांच्या विचारांमध्ये मतभेदसुद्धा दिसून येऊ शकतात.

हेही वाचा : भाजीत तेल जास्त झालंय? टेन्शन घेऊ नका, या ट्रिकने झटक्यात वेगळं करा तेल

चांगले परिणाम

  • ‘एज गॅप रिलेशनशिप’मध्ये समजूतदारपणा खूप लवकर येतो.
  • अशा नात्यात जोडीदार एकमेकांचा आदर करतात.
  • वयातील अंतर पाहून जोडपे त्यांचे नाते खूप मनापासून जपतात.
  • एक जोडीदार वयाने मोठा असल्यामुळे दुसऱ्या जोडीदाराच्या भावना तो चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो.
  • अशा नात्यात दोन्हीही जोडीदार एकमेकांच्या समस्या आणि अडचणी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात.

वाईट परिणाम

  • ‘एज गॅप रिलेशनशिप’मध्ये अहंकारामुळे दुरावा येऊ शकतो.
  • अशा नात्यात एका ठराविक काळानंतर विचार जुळवून घेणे कठीण जाते.
  • दोन व्यक्तींच्या वयात अंतर असल्यामुळे त्यांचे विचार आणि आवडी-निवडी या वेगवेगळ्या असू शकतात. यामुळे मतभेद होण्याची दाट शक्यता असते.

हेही वाचा : नेहमी मोमोज खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात …

या गोष्टी समजून घ्या

  • अशा नात्यात वावरताना एकमेकांबरोबर जास्तीत जास्त गोष्टी शेअर कराव्यात.
  • जोडीदाराचा नेहमी सल्ला घ्यावा.
  • एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवू नये.
  • आपल्या जोडीदाराची दुसऱ्या व्यक्तीबरोबर कधीही तुलना करू नये.
  • जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा.
  • जोडीदाराच्या आवडी-निवडी जाणून घ्याव्यात.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader