संपूर्ण देशातील राम भक्त २२ जानेवारी २०२४ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी अयोध्येत बांधलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा प्राणपतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी १६ जानेवारीपासूनच अनेक विधीवत कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. यानिमित्त देशभरातील प्रसिद्ध राम मंदिरात पूजा-अर्चा केली जात आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे देशभरात अनेक प्रसिद्ध अशी राम मंदिरं आहेत, जेथे दरवर्षी हजारो राम भक्त मोठ्या श्रद्धेने भेट देत असतात. देशातील अशाच सात प्रसिद्ध राम मंदिरांविषयी जाणून घेऊ…

१) रामतीर्थम, आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशातील विझियानगरम येथे स्थित रामतीर्थम हे नयनरम्य टेकड्यांमध्ये वसलेले प्राचीन प्रभू राम मंदिर आहे. हे मंदिर १७ व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. दक्षिण भारतातील प्रभू रामाच्या चिरस्थायी वारशाचा हा पुरावा आहे. या प्राचीन मंदिराच्या बांधकामाशी आणि अस्तित्वाशी संबंधित अनेक स्थानिक आख्यायिका आहेत.

MahakumbhMela 2025
Mahakumbh Mela 2025: हिंदू साधू हे व्यापारी की योद्धे? साधूंचे आखाडे नेमके आहेत तरी काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
Pune , House , Building , Redevelopment ,
लोकजागर : घर म्हणजे फक्त इमारत असते का?
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”
Loksatta natyarang Ramayana drama Urmilyan Indian culture
नाट्यरंग: ऊर्मिलायन;दृक् श्राव्यकाव्याची नजरबंदी
राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येतल्या लोकांचं आयुष्य कसं बदललं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येतल्या लोकांचं आयुष्य कसं बदललं?
Protest against adani in kurla in the leadership of varsha gaikwad
अदानीविरोधात कुर्लावासीय रस्त्यावर; मदर डेअरीचा जागा धारावीसाठी देण्यास तीव्र विरोध

पंतप्रधान मोदींचा ११ दिवस केवळ नारळ पाणी पिऊन उपवास; पण शरीरासाठी हे कितपत फायदेशीर? काय सांगतात डॉक्टर? वाचा

२) राम राजा मंदिर, ओरछा, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील ओरछा या ऐतिहासिक शहरात वसलेले राम राजा मंदिर हे सर्वात पुरातन प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील कोरीव काम वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. १६ व्या शतकात बुंदेला राजपूतांच्या कारकिर्दीत बांधलेले हे मंदिर आहे. भगवान आणि राजा या दोन्हींच्या रूपात श्रीरामाची पूजा केली जाणारे हे एकमेव मंदिर आहे.

३) रघुनाथ मंदिर, जम्मू आणि काश्मीर

जम्मूमधील टेकडीवर वसलेले रघुनाथ मंदिर हे प्रभू रामाला समर्पित एक प्राचीन मंदिर आहे. हे राज्य आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी जितके प्रसिद्ध आहे, तितकेच प्रसिद्ध इथले रामाचे मंदिर आहे. हे मंदिर एक आध्यात्मिक विश्रामाचे एक केंद्र आहे, जेथील भाविकांना शांत वातावरणात देवाची भक्ती करता येते.

४) रामनगर किल्ला मंदिर, वाराणसी

वाराणसी हे भारताचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. जेथील रामाचे रामनगर किल्ले मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. बनारसच्या महाराजांनी १८ व्या शतकात बांधलेले ऐतिहासिक किल्ल्याच्या संकुलात हे मंदिर बांधले आहे. त्यामुळे गंगेच्या गजबजलेल्या घाटांपासून दूर आरामाच्या शोधात असलेल्या यात्रेकरूंना हे मंदिर आकर्षित करते.

५) राम तीरथ मंदिर, अमृतसर, पंजाब

पंजाबमधील अमृतसर येथे स्थित राम तीरथ मंदिर भगवान राम आणि सीता यांच्या पुत्र लव आणि कुश यांच्या जन्माशी संबंधित आहे. हे मंदिर त्याच्या प्राचीन विहिरीसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये उपचार शक्ती असल्याचे मानले जाते. लंका जिंकल्यानंतर वाल्मिकी ऋषींनी माता सीतेला आश्रय दिला ते हेच ठिकाण आहे.

६) रामजी मंदिर, कानपूर

कानपूर शहराच्या मध्यभागी रामजी मंदिर आहे, जे शहराच्या औद्योगिकीकरणापूर्वीचे जुने मंदिर आहे. शहरी गजबजाटात आध्यात्मिक शांतता मिळवण्यासाठी भक्त या मंदिरात येतात .

७) सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा

गोदावरी नदीच्या काठावर स्थित, भद्राचलममधील सीता रामचंद्रस्वामी मंदिर आहे. हे मंदिर १७ व्या शतकातील आहे. मंदिर परिसर रामायणाच्या महाकाव्याचे आणि त्यासंबंधित गोष्टींचे शिल्प आहेत. या मंदिरातील कोरीव काम अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे.

Story img Loader