नवी दिल्ली : ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ म्हणजेच ‘एम्स’मधील संशोधकांनी आपण श्वास सोडत असलेल्या संयुगांपासून रोग ओळखण्यासाठी ‘ब्रेथ प्रिंट’ उपकरण तयार केले आहे. ‘ई-नोझ’ नावाच्या या उपकरणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान होण्यास मदत होऊ शकते, असे या संशोधकांकडून सांगण्यात आले. या उपकरणात फुंकणे आवश्यक आहे. ब्रीथलायझरसारखे हे उपकरण असून फुंकर मारल्याने तुम्हाला फुप्फुसाचा कर्करोग आहे की नाही हे सांगता येईल. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये काही भागांत आरोग्य सुविधा विलंबाने पोहोचतात, तिथे फुप्फुसाचा कर्करोग लवकर शोधण्यास मदत होऊ शकते, असे एम्सच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्रेथ रिसर्चचे प्रमुख डॉ. अनंत मोहन यांनी सांगितले. आपण सोडत असलेल्या श्वासातील अस्थिर सेंद्रिय संयुगामुळे साधारणत: फुप्फुसाचा कर्करोग होतो. या उपकरणामुळे हा आजार ओळखण्यास मदत होईल, असे मोहन यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा