दिल्ली आणि तेथील आसपासच्या परिसरातील हवेतील प्रदूषणाची पातळी चिंताजनकरित्या वाढली आहे. या वाढत्या वायू प्रदूषणामुळे लोकं आता आजारी पडू लागले आहेत. यात लोकांना घशाचा संसर्ग, सर्दी अशा प्रकरणांमध्ये सर्वात सामान्य संसर्ग होत आहे. विशेषत: दिवाळीनंतर दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती, मात्र असे असतानाही फटाके वाजवले जात होते. परिणामी, संपूर्ण दिल्ली एनसीआरमधील हवेची गुणवत्ता आज गंभीर स्थितीत पोहोचली आहे.

प्रदूषणात वाढ होत असल्याने याचा लोकांच्या आरोग्यावर विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही काळापूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले होते की, शहरांमधील वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे. मुलांचे शरीर खूपच कमकुवत असते, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

मुलांना गंभीर आजारांचा धोका वाढला

तर यावेळी उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे संचालक आणि संस्थापक डॉ. शुचिन बजाज म्हणाले, “हवेची गुणवत्ता खूपच खराब झाली आहे. ती आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. हिवाळा सुरू झाल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होते. या वेळी झालेले प्रदूषण दूर होण्यासाठी सुमारे ४ महिने लागतात त्यामुळे आता याचा अर्थ असा होतो की लोकांना अधिक काळ या हानिकारक हवेत श्वास घ्यावा लागणार आहे. या खराब हवेच्या गुणवत्तेमुळे प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होतो, परंतु याचा लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम होतो. प्रत्येक मुलाची पर्यावरणीय घटक आणि प्रदूषण कमी करण्याची किंवा डिटॉक्स करण्याची क्षमता वेगळी असते. याव्यतिरिक्त, मुलांमध्ये वायुमार्गाचा एपिथेलियम प्रौढांपेक्षा अधिक प्रवेशयोग्य असतो, ज्यामुळे त्यांना रोग होण्याची अधिक शक्यता असते. दिल्ली आणि गुरुग्रामसारख्या प्रदूषित शहरांमध्ये वाढणाऱ्या धोकदायक हवेचा मुलांच्या अविकसित फुफ्फुसांवर आणि श्वसनसंस्थेवर होणारा परिणाम विनाशकारी असू शकतो.”

मुलांना प्रदूषणापासून कसे वाचवायचे?

घरातून बाहेर पडताना मुलांना मास्क घालायला लावा

कोरोना महामारीमुळे आपण सर्वजण मास्कशिवाय घराबाहेर पडत नाही, परंतु वायुप्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर मुलांनी N95 मास्क घालण्याची खात्री करा. त्याशिवाय त्यांना घराबाहेर पडू देऊ नका.

कमी प्रमाणात बाहेर पडा

या काळात लहान मुले व वृद्धांनी क्वचितच घराबाहेर पडावे. नवजात मुलांना बाहेर घेऊन जाणे टाळा आणि मोठ्या मुलांना मास्कशिवाय बाहेर जाऊ देऊ नका.

घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा

खिडक्या आणि दरवाजे विषारी प्रदूषकांना घरात प्रवेश करू देतात, म्हणून त्यांना बंद ठेवा. याशिवाय धुळीने माखलेली किंवा जास्त घर साफसफाईची कामे टाळा.

एक ह्युमिडिफायर ठेवा

श्‍वसनाशी संबंधित आजाराशी त्रस्त लोकांनी घरी एअर प्युरिफायर बसवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. प्युरिफायरमध्ये अनेक प्रकारचे फिल्टर असतात, जे घरातील अशुद्ध हवा काढून टाकण्यास मदत करतात. याशिवाय, हे बॅक्टेरिया घराबाहेर काढून घरातील हवा शुद्ध करते.

मुलांना तीव्र वासाच्या गोष्टींपासून दूर ठेवा

परफ्यूम किंवा रंगांसारख्या गोष्टी हवेत हानिकारक कण सोडतात, त्यामुळे अश्या गोष्टीपासून नवजात मुलांना दूर ठेवणे चांगले. कारण ते इनहेलेशनद्वारे फुफ्फुसासाठी विषारी सिद्ध होऊ शकतात आणि भविष्यात श्वसनाचे आजार होऊ शकतात.

Story img Loader