मागील काही महिन्यांपासून भारतात टेलिकॉम कंपन्यांकडून सातत्याने नवनवीन ऑफर्स जाहीर करण्यात येत आहेत. नुकतीच एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. जिओने नुकताच आपला ३९८ रुपयांचा प्लॅन जाहीर केला. त्यानंतर आता एअरटेलने या प्लॅनला टक्कर देणारा ३९९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनची व्हॅलिडीटी तब्बल ८४ दिवसांची असेल.
एअरटेलच्या या प्लानमध्ये दिवसाला १ जीबी ३जी/४जी डेटाबरोबरच अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉईस कॉल तसेच दिवसाला १०० फ्री एसएमएस मिळणार आहेत. दिवसाला २५० मिनिटांचे कॉल आणि आठवड्याला १ हजार मिनिटांचे कॉल फ्री असतील. जिओच्या ३९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला १.५ जीबी ३जी/४जी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दिवसाला १०० फ्री एसएमएस आणि जिओ अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. पण जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी ७० दिवसांची आहे. त्यामुळे एअरटेल १४ दिवसांची जास्त व्हॅलिडीटी देत असल्याचे दिसते.
याआधीही एअरटेलने जिओच्या १४९ च्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी १४९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला होता. सध्या तो केवळ आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये सुरु असून इतर ठिकाणच्या एअरटेलच्या ग्राहकांना तो उपलब्ध होऊ शकत नाही.