Happy Akshay Tritiya 2025 Wishes: हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते.यावेळी अक्षय्य तृतीया हा सण बुधवार, ३० एप्रिल रोजी साजरा होणार आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेला विशेषतः देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्यांच्या आशीर्वादाने सुख-समृद्धीने आपल्या घराची भरभराट होते, असे मानले जाते. या दिवशी सर्व जण त्यांच्या जीवनात समृद्धी येवो, अशी प्रार्थना करतात. या शुभ दिवशी तुम्हालाही तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाइकांना अक्षय्य तृतीयेला शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आज आम्ही तुमच्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. या शुभ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा देऊन अक्षय्य तृतीयेचा आनंद द्विगुणीत करा. पाहा याखास शुभेच्छा…

अक्षय्य तृतीयेला द्या ‘या’ मंगलमय शुभेच्छा!

१)

तुमचे प्रत्येक काम असावे परिपूर्ण,
न काही राहो अपूर्ण,
दुःख, दारिद्र्याचा करूनी नाश
घरात होवो देवी लक्ष्मीचे आगमन!

२)

क्षय व्हावी दरिद्रता अन्
दूर व्हावे दुःख तुमचे,
अक्षय्य तृतीयेच्या मंगल दिनापासूनी
ऐश्वर्य, धन-संपत्तीसह सुदृढ राहावे आरोग्य तुमचे!

३)

घन न घन जसा बरसतो ढग,
धो धो जसा कोसळतो पाऊस
चारही दिशेत संचारते ऊर्जा!
तशीच होवो आपल्या दारी धनाची वर्षा,
मंगलमय होवो अक्षय्य तृतीयेचा पावन सण!

४)

घरात तुमच्या देवी लक्ष्मीचा वास असो,
प्रत्येक विचारामध्ये देवी सरस्वतीची साथ असो,
संरक्षण करण्यास आसपास देवी दुर्गेचा वास असो,
तसाच आई-वडिलांचा आशीर्वाद असो,
त्यांच्याच पुण्याईने जीवन जाई उजळूनी,
येई सुख, समृद्धी अन् लाभ जीवनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी…
शुभेच्छा आपणास अक्षय्य तृतीयेच्या पावन दिनी…!

५)

अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे…
असो तुमची कीर्ती अपरंपार..
होवो तुमचा सदा जयजयकार…
होवो तुमचा सदा जयजयकार…
अक्षय्य तृतीया दिनाच्या आपणास मंगलमय शुभेच्छा..!

६)

नुसतीच नाही सोने-चांदीची खरेदी
दानाचंही आहे महत्त्व या दिवशी
हा सण आहे भरभराटीचा…
हा सण आहे दानधर्माचा..
अक्षय्य पुण्याची प्राप्ती करून देणारा सण!
सर्वांना मिळो मनाचे बळ…
सर्वांना मिळो अक्षय फळ…
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

७)

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या
कृपेसोबतच
तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही
वर्षाव होवो…
अक्षय्य तृतीयेच्या या शुभ दिवशी
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

८)

अक्षय्य होवो मानवता
मत्सर होऊ दे क्षय
प्रेमाचा होऊ दे वर्षाव अन्
द्वेष करणारे जावेत पळून
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!!

९)

“जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा…”

१०)

दारी तुमच्या सोनपावलांनी व्हावे लक्ष्मीचे आगमन
चारही दिशा जाव्या उजळून,
अलक्ष्मीचा नाश होऊन
सुख-समृद्धी, संपत्ती वाहू दे भरभरून!
अक्षय्य तृतीयेच्या चैतन्यमय अक्षय्य शुभेच्छा…

११)

तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो सदैव वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रिजयनांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.