Alia Bhatt’s Weight Loss Plans: आलिया भटने मागील वर्षी यशाची अनेक शिखरे पार केली. गंगुबाईला मिळालेल्या यशाने आलिया बॉक्स ऑफिसवर गाजली. हॉलिवूडमध्ये सुद्धा गॅल गडोटसह चित्रपट तिच्या वाट्याला आला. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आलियाने लग्न- बाळ असे अनेक बदल अनुभवले. एकूणच काय तर यशाची मोठी झोळी घेऊन आता ती आयुष्याच्या ३० व्या वर्षात पदार्पण करत आहे. आलियाने सिनेमामध्ये काम करू लागल्यापासून कामाच्या, चित्रपटांच्या निवडीच्या व स्वतःच्या लाइफस्टाइलमध्येही अनेक बदल केले. पण या बदलांची खरी सुरुवात ती चित्रपटात येण्याआधीच झाली होती. आलियाने स्टुडंट ऑफ द इयरमध्ये कामापूर्वी सहा महिन्यात तब्बल २० किलो वजन कमी केले होते. तुम्हीही जर वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल तर आलियाचा डाएट प्लॅन व फिटनेस रुटीन एकदा नक्की जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया भट्ट डाएट प्लॅन (Alia Bhatt Diet)

आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी सांगितले की, उन्हाळ्यात ज्वारी, हिवाळ्यात बाजरी आणि पावसाळ्यात नाचणीच्या पातळ भाकऱ्या व पोळ्या. हंगामी फळे, हर्बल चहा, अंडी हे सर्व आलियाच्या संतुलित आहाराचा भाग आहेत. दूध, लस्सी आणि ताक हेही तिचे आवडते पदार्थ आहेत. आलिया खिचडी, डाळ- भात आणि एक चमचा तूप घालून दही भात सुद्धा खात होती.

आलिया भट्ट फिटनेस रुटीन (Alia Bhatt Fitness Routine)

आलियाच्या फिटनेस रुटीनचा अंदाज तिच्या इंस्टाग्रामकडे बघून येतो. बाळ झाल्यावर सुद्धा आलिया नियमित व्यायाम करते. यापूर्वी वजन कमी करताना तिने जिम किकबॉक्सिंग, डेडलिफ्टिंग आणि मुख्य वर्कआउट्स आवर्जून केले आहेत. आलिया योगा सुद्धा करते.

आलियाची डाएट ट्रिक (Alia Bhatt Diet Trick)

आलियाने सांगितले की, तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही किती खाता हे महत्त्वाचे असते. त्यामुळे आलियाने वजन कमी करताना पोर्शन कंट्रोल म्हणजेच मर्यादित खाण्यावर भर दिला होता. तुम्हाला भूक जास्त लागत असेल तर उपाशी राहू नका. उलट तुम्ही थोड्या थोड्या अंतराने खाऊ शकता, जेणेकरून तुमच्या पोटाला खाल्लेले अन्न पचवण्यास सुद्धा वेळ मिळेल. आलिया दिवसातून ६ ते ७ वेळा खाऊन आपल्या जेवणाचे व पोषणाचे भाग करायची.

दरम्यान, आपणही आलियाप्रमाणे वजन कमी करू इच्छित असाल तर वरील टिप्स वापरून पाहू शकता. डाएट प्लॅनसाठी एकदा तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक उचित ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt 20 kg weight loss by simple tricks alia diet plan for loosing kilos after baby raha birthday special svs