मारुती सुझुकी आपली लोकप्रिय हॅचबॅक WagonR नव्या रुपात लाँच करणार आहे. 23 जानेवारी रोजी ही कार भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या वॅगनआरच्या लाँचिंगआधीच अनेक फिचर्सचा खुलासा झाला आहे. नव्या WagonR ची टाटा टिआगो, नवी सँट्रो, दॅटसन गो यांसारख्या कारशी थेट टक्कर असेल. त्यामुळेच कंपनी या कारला लेटेस्ट फिचर्ससह बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या कारचं डिझाइन टॉल बॉयप्रमाणेच असेल. गाडीचे रूपडे आतून आणि बाहेरून बदललेले दिसणार आहे. पहिल्या वॅगनआरच्या तुलनेने ही गाडी अधिक मोठी असणार आहे. गाडीत सात इंचाची टाचस्क्रीनसह इंफोटेनमेन्ट प्रणाली असणार आहे. गाडी ही नव्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली असून पूर्वीच्या मॉडेलहून वजनाने हलकी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गाडीत १ लिटरचे ६८ बीएचपी ऊर्जा निर्माण करणारे इंजिन असणार आहे. नवी वॅगनआर ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येणार आहे. गाडीचे मायलेज चांगले असल्यास गाडी ग्राहकांच्या पसंतीला उतरण्याची शक्यता आहे. गाडी पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजी व्हर्जनमध्येदेखील उपलब्ध केली जाणार आहे. 23 जानेवारी रोजी ही गाडी बाजारात दाखल होण्याची शक्यता असून किंमत ४ ते ७ लाख असू शकते.