Almond Overnight Almonds : बुद्धी तल्लख करण्यासाठी आई घरात कायम बदाम खायला द्यायची. तुमच्याही घरात असं होत असेल ना? किंवा तुम्ही पण मुलांना बदाम खायला देत असाल. कारण बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे बदाम अनेक घरात खाले जातात. अगदी अचानक भूक लागते म्हणून आपण एक छोट्या डब्बात ड्रायफूट्स ठेवतो. थोडे ड्रायफूट्स खाल्ले की आपल्याला बरं वाटतं. भिजवलेले बदाम खाण्याची प्राचीन परंपरा भारतात आहे. भिजवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्यातील पोषकद्रव्ये पचायला सोपी जावीत आणि सालं सहज काढता येतात.बदाम भिजवल्याने त्यात असलेली पोषकतत्त्वे अधिक उपलब्ध होतात. पण साल काढून टाकल्यानंतर खरंच बदाम आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात का ? पण, बदाम सोलून खावेत की न सोलता खायला हवेत, याबद्दल बरेच लोक संभ्रमात असतात याविषयी जाणून घेऊया.

जाणून घ्या बदाम खाण्याचा योग्य मार्ग

बदाम सोलून खावेत की न सोलता खावेत यावर बऱ्याच लोकांचे दुमत असते. बरेच लोक फक्त घाईघाईत सालासकटच बदाम खातात. यामुळे त्यांना बदामाचा पूर्णपणे लाभही मिळत नाही. बदामाचे साल पचायला खूप जड आहे. बदामाच्या सालामध्ये टॅनिन नावाचा एन्झाइम असतो. यामुळे पोषक घटक शरीरात पूर्णपणे शोषले जात नाहीत. म्हणूनच बदाम नेहमी सोलूनच खाल्ले पाहिजेत. त्यामुळे साल काढून बदामाचे संपूर्ण पोषक तत्व शरीरात सहज शोषले जाऊ शकतात. बदामाची त्वचा काढून टाकण्याचे इतर फायदे देखील आहेत. बदामाची साल कडू असल्यामुळे बदामाची चव खराब होते. त्वचा काढल्याने बदामाचा गोडवा टिकून राहतो. तसेच सालीवर आरोग्यासाठी हानिकारक कीटकनाशके आणि रसायने देखील असू शकतात.

kachya papayachi sukhi bhaji recipe in marathi bhaji recipe
कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Refined Oil Vs Cold Pressed Oil: Which Is Healthier For Cooking? know everything health tips
रिफाइंड तेल वापरायचे की घाण्याचे? स्वयंपाक आणि तब्येतीसाठी कोणतं तेल योग्य कसं ठरवणार? जाणून घ्या
maha navami kanya pujan 2024 prasadacha shira
महानवमी, कन्या पूजन स्पेशल : कपभर रव्यापासून अवघ्या १० मिनिटांत बनवा मऊ लुसलुशीत, गोड प्रसादाचा शिरा
sago barfi for fasting
उपवासासाठी खास साबुदाण्याची बर्फी; एकदम सोपी रेसिपी
Rice & Weight Gain : how to eat rice the right way
Rice & Weight Gain : असा खा भात, वजन अजिबात वाढणार नाही, भात खाण्याची योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
how to download birth certificate online from home
जन्माचा दाखला घसबसल्या कसा काढायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती? जाणून घ्या
leftover roti ladoo marathi recipe
leftover roti ladoo : गोड खाण्याची इच्छा होते? मग घरीच, झटपट बनवा पोळीचे लाडू; लिहून घ्या रेसिपी

बदामाचे काही प्रमुख फायदे

  • हृदयासाठी फायदेशीर – बदाम हृदयासाठी फायदेशीर मानले जाते. हेल्दी फॅटी ऍसिडस्, विशेषतः मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स बदामामध्ये आढळतात जे हृदयासाठी चांगले असतात.
  • वजन कमी करण्यात मदत – बदामामध्ये फायबर, प्रथिने आणि चांगले फॅट्स असतात जे भूक नियंत्रित करण्यास मदत करतात आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.
  • रक्तातील साखरेचे नियंत्रण – बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  • योग्य पोषण- बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि इतर महत्त्वपूर्ण खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
  • वाढत्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण – बदामामध्ये स्टेरॉल आणि फायबर असतात जे वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
  • अँटिऑक्सिडंट स्त्रोत – व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जो शरीराच्या पेशींना नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतो.
  • सांधे आणि स्नायूंसाठी – बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे सांधे आणि स्नायू निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत.
  • त्वचेसाठी फायदेशीर – बदामाचे तेल त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून वापरले जाते आणि ते त्वचा मऊ आणि कोमल ठेवते.

हेही वाचा – डायबिटीज पेशंट्सनी बटाटा खावा की खाऊ नये? भाजी शिजवण्याची पद्धत कशी बदलायला हवी? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

  • या सर्व फायद्यांचा विचार करता रोजच्या आहारात बदामाचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. तरीसुद्धा, ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे, कारण ते कॅलरीज वाढवते.