High Protein Vegetarian Food: शरीराला आवश्यक पोषणसत्व मिळवण्यासाठी मांसाहार महत्त्वाचा आहे असे अनेकजण सांगतात. यात अगदीच तथ्य नाही असं म्हणता येणार नाही. खरंतर मांस, मच्छी, अंडी यामधून आवश्यक प्रोटिन्स शरीराला मिळत असतात. पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर? फक्त भाज्या, फळे व डाळीच नाही तर अगदी चमचमीत शाकाहारी पदार्थांमध्ये सुद्धा आपल्याला अनेक पोषक सत्व लाभू शकतात. असे हे नेमके प्रोटीनचे साठे असणारे पदार्थ तरी कोणते हे आता आपण जाणून घेऊयात..
हेल्थ लाइनच्या माहितीनुसार एका सुदृढ पुरुषाला दिवसाला ५५ ग्राम प्रोटीनची आवश्यकता असते तर एका सुदृढ महिलेला ४५ ग्राम प्रोटीन आवश्यक असते. खाली नमूद केलेल्या १० प्रकारच्या शाकाहारी पदार्थांमधून आपण आवश्यक तितके प्रोटीन नियमित मिळवू शकता.
१) भोपळ्याच्या बिया: यामध्ये केवळ प्रोटिन्सच नव्हे तर मॅग्नेशियम व लोहाचे प्रमाण सुद्धा मुबलक असते. एक ते दीड कप भोपळ्याच्या गरामध्ये १६ ग्रॅम प्रोटीन असते. भोपळ्याची भाजी, भजी, पराठे किंवा सूप अशा रेसिपीज बनवून आपण हे प्रोटीन मिळवू शकता.
२) पालक: अमेरिकन कृषी विभागाच्या अन्न पोषक डेटानुसार एक कप पालकात ५ ग्राम प्रोटीन असते. प्रोटीनसह लोहाने आपल्या हाडांना मजबुती मिळू शकते. याशिवाय पाक हा कॅल्शियमचा सुद्धा उत्तम स्रोत आहे.
३) मसूर डाळ: USDA च्या माहितीनुसार एक वाटी मसूरच्या डाळीत १९ ग्रॅम प्रोटीन व १५ ग्राम फायबर असते. जर तुमच्या शरीरात प्रोटीनचे कमी असेल तर आपण नियमित जेवणात सुद्धा मसूरच्या डाळीचा समावेश करू शकता.
४) अख्खे चणे: हेल्थ लाईनच्या माहितीनुसार एक वाटी उकडलेल्या चण्यामध्ये १६ ग्रॅम प्रोटीन असते. आपण इतर भाज्यांसह किंवा अगदी चाट बनवून सुद्धा चणे खाऊ शकता.
५) वाल/ पावटे: एक वाटी भिजवल्या पावट्यामध्ये १६ ग्राम प्रोटीन असते, याशिवाय लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम व व्हिटॅमिन बी शरीराला मिळवून देण्याचे काम सुद्धा हे कडधान्य करते.
६) चिया सीड्स : चिया सीड्स या प्रोटीनचे भांडार असतात. फक्त एक चमचा चिया सीड्समध्ये २१५ ग्राम प्रोटीन असते.
७) पनीर: एक वाटी पनीर मध्ये १० ग्राम प्रोटीन असते.
हे ही वाचा<< खराब कोलेस्ट्रॉल फेकून देईल लसणाचे तेल; केस व हृदयासाठीही बेस्ट! तज्ज्ञांनी सांगितलेली वापराची पद्धत पाहा
८) ब्रोकोली: एक वाटी ब्रोकोलीमध्ये ६ ग्राम प्रोटीन, ३० टक्के कॅल्शियम असते. यामुळे अँटी बॅक्टरीयल सत्व सुद्धा शरीराला मिळतात.
९) क्विनोआ : एक वाटी क्विनोआ मध्ये ८ ग्रॅम प्रोटीन असते. वजन कमी करण्यातही क्विनोआची खूप मदत होते.
१०) काजू, बदाम, शेंगदाणे, अक्रोड, मनुका आणि हेझलनट्स यांसह सूर्यफुलाच्या बिया हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)