काजू हे ड्राय फ्रूट अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय ड्राय फ्रूट आहे. जे खायला चविष्ट तर आहेच पण अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर ठेवण्यासही मदत करते. आपण भारतातही काजूचा वापर खीर, हलवा आणि बर्फी बनवण्यासाठी करतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्स तर भरपूर असतातच पण त्यामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत काजू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. काजूमध्ये खनिजे, लोह, फायबर, फोलेट, अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे केवळ रक्तदाब नियंत्रणात ठेवत नाही तर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. चला जाणून घेऊया काजू खाण्याचे अजून फायदे…

( हे ही वाचा: Marriage Horoscope 2022: नवीन वर्षात तुमचे लग्न होईल की नाही? या ‘५’ राशींसाठी आहे खुशखबर )

रक्तातील साखरेची पातळी

२०१९ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळले आहे की काजू मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहेत. टाईप-२ मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या आहारात काजूचा समावेश करू शकतात. काजू खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनची पातळी कायम राहते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

( हे ही वाचा: सासरी ‘या’ राशीच्या मुलींच्या शुभ पावलांनी येते आर्थिक समृद्धी, जाणून घ्या काय आहे विश्वास )

रक्तदाब

बदाम, शेंगदाणे आणि अक्रोड यांसारख्या इतर सुक्या फळांच्या तुलनेत काजूमध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण थोडे कमी असते. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी काजूचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कारण काजू शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी (फॅटचा एक प्रकार, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो) कमी होतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये भाजलेले काजू समाविष्ट करू शकता.

( हे ही वाचा: थंड किंवा गरम? कोणत्या प्रकारच्या पाण्याने केस धुवावे? )

मेंदूला करते तीक्ष्ण

काजू लोह, मॅग्नेशियम आणि झिंकचा चांगला स्रोत आहे. काजूमध्ये आढळणारे सॅच्युरेटेड, मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड चांगले फॅट्स मानले जातात. मोनोअनसॅच्युरेटेड फॅट निरोगी हृदयासाठी चांगली असते. त्यामुळे काजू खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी असतो. काजूमध्ये आढळणारे लोह पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. मॅग्नेशियम स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते आणि वयानुसार स्मरणशक्ती कमी होण्यास प्रतिबंध करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along with blood sugar cashew nuts also control high bp learn other benefits ttg