उन्हामुळे अनेकदा त्वचा काळी पडते. सर्वात अधिक काळेपणा हा मानेजवळ दिसून येतो. अनेकदा मान स्वच्छ करून देखील त्वचा काळीच राहाते. यामुळे तुमच्या सुंदरतेवरही परिणाम होते. मात्र, ही समस्या दूर करता येऊ शकते. एका घरगुती उपायाने काही दिवसातच मानेला आलेला काळा रंग दूर होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या उपयाने काळेपणा कमी होऊ शकतो

मानेचा काळेपणा घालवण्यासाठी तूरटीचा वापर फायदेशीर ठरू शकतो. एक चम्मच तूरटीचे पावडर घ्या आणि त्यात समान प्रमाणात मुल्तानी माती टाका. त्यानंतर यात एक चम्मच गुलाब जल आणि १ ते २ चम्मच निंबूचे रस टाकून पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट काळ्या मानेला आणि शरीराच्या अन्य काळ्या पडलेल्या भागांना चांगल्याप्रकारे लावा. पेस्ट १५ ते २० मिनिटे लावून सोडून द्या आणि सुकू द्या.

(बोटांची साल निघते? मग ‘हे’ घरगुती उपाय ठरू शकतात फायदेशीर)

सुकल्यावर पाण्याने धुवा

तूरटी आणि मुल्तानी मातीची पेस्ट लावल्याच्या २० मिनिटानंतर ती पाण्याने धुवून टाका. मात्र, यावेळी साबण वापरू नका आणि मान धुण्यासाठी केवळ पाण्याचा वापर करा. मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा. चांगल्या परिणामांसाठी झोपण्यापूर्वी हा उपाय करा. याने मानेचा काळेपणा जाण्यास मदत होईल.

बेकिंग सोडा आणि गुलाब जलचाही वापर करू शकता

तूरटी आणि मुल्तानी मातीच्या पेस्ट व्यतिरिक्त बेकिंग सोडा आणि गुलाब जलच्या मिश्रणाचा देखील वापर करता येऊ शकतो. याने देखील मानेचा काळेपणा दूर होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alum could remove darkness of skin ssb