Why Feeling Hungry After Eating : सहसा दिवसा ठरावीक वेळेत खाल्ल्यानंतर पुन्हा भूक लागत नाही. पण काही लोक असे असतात ज्यांना पोटभर खाल्ल्यानंतरही पुन्हा भूक लागते. यात काही लोक रागाने किंवा दु:खी असताना स्वत:ला शांत ठेवण्यासाठी भावनिक दृष्ट्या खाणे सुरु ठेवतात. जास्त खाण्यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु त्या कारणांचे उत्तर शोधणे अत्यंत आवश्यक आहे. जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा आणि ह्रदयाशी संबंधित समस्या उद्भवतात. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खाता तेव्हा तुम्हाला सूज येणे, छातीत जळजळ आणि पचनासंबंधीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. चला तर मग जाणून घेऊ सतत भूक लागण्यामागची काय कारणं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ कारणांमुळे लागते सतत भूक

१) झोप न लागणे

पुरेशी झोप न मिळाल्यास तुम्हाला गरजेपेक्षा जास्त भूक लागते. कारण झोपेच्या कमरतेमुळे भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. ज्या लोकांना झोप येत नाही, त्यांना खूप भूक लागते आणि जेवल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटत नाही.

२) प्रोटीन्सची कमतरता

शरीरात प्रोटीन्सची कमतरता असल्याने देखील तुम्हाला सतत भूक लागू शकते. कारण प्रोटीन्समुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे तुमच्या कॅलरीस कमी होतात. आहारात प्रोटीन्सचा समावेश केल्याने शरीरात काही संप्रेरकांचे उत्पादन वाढते जे तुम्हाला पोट भरण्याचे संकेत देतात आणि तुमची भूक नियंत्रित करतात.

३) डिहायड्रेशन

शरीराच्या योग्य कार्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. तुमच्या ह्रदयाचे आरोग्य, मेंदूचे आरोग्य आणि पाचक आरोग्यासाठी पाणी खूप फायदेशीर मानले जाते. पाणी तुम्हाला पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. पण जेव्हा तुम्ही खूप कमी पाणी पिता तेव्हा तुम्हाला खूप भूक लागते.

४) मधुमेह

मधुमेह असलेल्या लोकांना सामान्य लोकांपेक्षा जास्त भूक लागते. यावेळी रक्तातील ग्लुकोज इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे पेशींमध्ये प्रवेश करुन शकत नाही. अशापरिस्थितीत शरीरातील अन्नाचे ऊर्जेत रुपांतर होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला खूप भूक लागते. मधुमेहाच्या काही लक्षणांमध्ये, जास्त तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, दृष्टी अंधुर होणे, थकवा आणि हाता, पायांना मुंग्या येणे.

५) गर्भधारणा

जास्त भूक लागण्यामागे गर्भधारणा हे आणखी एक कारण आहे. पोटात वाढणाऱ्या बाळाला सर्व आवश्यक पोषक द्रव्ये मिळावे यासाठी तुम्हाला सतत भूक लागत राहते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आणि योग्य अंतराने खाणे महत्वाचे आहे.

भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

१) अंडी, दही अशा प्रोटीनयु्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

२) जास्त मीठ आणि गोड पदार्थ खाणे टाळा.

३) स्वत:ला हायड्रेटेड ठेवा, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस पिऊ शकता.

४) अल्कोहोलचा वापर कमी करा. कारण अल्कोहोलने भूक वाढते.