सुका मेव्यातील बदामामध्ये सर्वात अधिक लो फॅट असते. तसेच बदामामध्ये प्रथिने अधिक असल्याने शरीराला उपयुक्त ठरते. बदामाच्या सेवनाने समरणशक्ती वाढते व डोळे तेजस्वी होण्यास मदत होते. त्यामुळे बदामाचे सेवन आपल्या रोजच्या आहारात घेणे महत्वाचे आहे. बदामाचे दूध हे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण रोज नियमित बदाम किंवा बदामाचे दूध घेतले तर शरीरातील अधिक समस्या दूर होतील. कारण बदामामध्ये कॅल्शियम, मॅगनेशियम, मॅंगेनिज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई हे घटक असून ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. चला तर मग जाणून घेऊयात बदाम दूध पिण्याचे फायदे.
१) वजन कमी करण्यास होते मदत
काही तज्ज्ञांच्या मते बदामाच्या दुधामध्ये लो कॅलरीज असल्याने आपल्या शरीरात फॅक्ट्स तयार होत नाही. जी माणसं फॅक्ट्स युक्त पदार्थ खात असतात त्यांचासाठी बदामाचे दूध उत्तम आहे. कारण बदामाच्या दुधात ८० टक्के कमी कॅलरीज असतात.
2) मधुमेह असणाऱ्यांनी करा बदामाच्या दुधाचे सेवन
जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्ही कॅलरीजने भरलेल्या दुधाच्या तुलनेत, बदामाच्या दुधाचे सेवन करा. बदामाच्या दुधात साखरेचं प्रमाण कमी असते आणि फायबर अधिक असते.
3) व्हिटॅमिन ई ने समृद्ध बदामाचे दूध
दररोज सकाळी आपल्या नाष्ट्यामध्ये बदामाचे दूध असणे आवश्यक आहे. कारण बदामाचे दूध हे संपूर्ण दिवसासाठी आपल्या शरीरात व्हिटॅमिन ई 20 ते 50 टक्के कार्य करते . व्हिटॅमिन ईने समृद्ध असल्याने ते उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते आणि यामुळे तणाव,जळजळ इत्यादींपासून मुक्ती देते.
४) कॅल्शियमने परिपूर्ण बदामाचे दूध
जर आपण दररोज एक कप बदाम दूध घेतले तर ते आपल्या शरीराला लागणारं 20 ते 45 टक्के कॅल्शियम दिवसाला पुरवण्यास मदत करतात, यामुळे आपले हृदय, हाडे, मज्जातंतू हे चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करतात.
५) व्हिटॅमिन डीनं समृद्ध
आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची सर्वात जास्त गरज असते, आणि सूर्यप्रकाश हा सर्वात मोठा स्रोत आहे व्हिटॅमिन डी चा. याने आपल्या हृदयाचे कार्य, हाडांची मजबुती आणि रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. पण आपल्याला रोजच्या धावपळीच्या जीवनात सूर्यप्रकाश नीट मिळत नसल्याने प्रत्येकाने रोज एक कप बदामाचे दूध घेतल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही.
रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या शरीराची काळजी घेणे महत्वाचे आहे. म्हणून दररोज बदामाचे दूध घेणे आवश्यक आहे.