uric acid control tips: युरिक ऍसिड हे प्युरीन असलेल्या पदार्थांच्या पचनातून निर्माण होणारे टॉक्सिन आहे. जेव्हा आपल्या शरीरात प्युरीनचे विघटन होते तेव्हा युरिक ऍसिड आढळते. आहारात मांस, मॅकरेल, वाळलेल्या बीन्स आणि बिअरचे सेवन केल्याने यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. साधारणपणे, किडनी यूरिक ऍसिड फिल्टर करते आणि लघवीद्वारे शरीरातून काढून टाकते, परंतु प्युरीन आहाराच्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील प्युरीनचे प्रमाण वाढू लागते. प्युरीनचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरात युरिक अॅसिड अधिक वेगाने तयार होऊ लागते. शरीरात युरिक अॅसिड तयार झाल्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी, स्नायू दुखणे, सूज येणे अशा तक्रारी वाढू लागतात.

युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात प्युरीन आहारावर नियंत्रण ठेवा आणि युरिक अॅसिड नियंत्रित करणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. युरिक ऍसिड नियंत्रित ठेवण्यासाठी मुळ्याचे सेवन हा रामबाण उपाय आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
fruits pack the most nutritional punch
Nutrient Rich Fruits : कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात तुम्हाला माहिती आहे का? मग आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी वाचा

आचार्य बालकृष्ण यांच्या मते, मुळा ही अशी भाजी आहे जी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. दिवसा किंवा सकाळच्या नाश्त्यात मुळा खाल्ल्यास दिवसभर युरिक अॅसिड नियंत्रणात राहते. मुळ्याच्या सेवनाने सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो. यूरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी मुळा किती फायदेशीर आहे आणि त्याचे सेवन कसे करावे हे जाणून घेऊया.

( हे ही वाचा: दोन प्रकारचे पदार्थ किडनीवर विषाप्रमाणे परिणाम करतात, किडनी निरोगी कशी ठेवावी जाणून घ्या…)

युरिक ऍसिडमध्ये मुळ्याचे फायदे

मुळा फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि अँथोसायनिन्स सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे शरीरातील दाह आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. मुळा मध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पोट, आतड्यांसंबंधी, किडनी आणि यूरिक ऍसिडच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी रामबाण उपाय आहे. युरिक अॅसिडच्या रुग्णांनी रोज मुळा खावा. मुळ्याच्या सेवनाने किडनी स्टोन बनण्याची समस्या दूर होते आणि किडनी निरोगी राहते. हे अॅसिडिटीला प्रतिबंध करते आणि यकृत निरोगी ठेवते.

युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी मुळ्याचे सेवन कसे करावे

युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सांधेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाची साल, पिंपळाची साल चूर्ण मुळा मिसळून सकाळ-संध्याकाळ सेवन करा. या काढाच्या सेवन केल्याने किडनीचे आजारही टाळता येतात. युरिक अॅसिडचे रुग्ण या काढाच्या सेवनाने यूरिक अॅसिडवर सहज नियंत्रण ठेवू शकतात.