दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज दूध प्यायल्याने शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषकतत्वे मिळतात. दररोज रात्री एक ग्लास दूध प्यायल्याने चांगली झोप देखील लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे लोक रोज दूध पितात त्यांचे वजन नियंत्रणात राहते. दुधात प्रोटीन आढळते जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. रोज एक ग्लास दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर दूध पिताना त्यात औषधी वनस्पती मिसळल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अश्वगंधा ही अशीच एक औषधी वनस्पती ज्याचे अनेक फायदे आहेत. अनेक काळापासून या औषधी वनस्पतीचा उपयोग चालत आलेला आहे. याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात. अश्वगंधा सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि निद्रानाशाच्या समस्येपासून मुक्ती मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही औषधी अशक्तपणा दूर करते. जर तुम्ही अश्वगंधाचे दुधासोबत सेवन केल्यास शरीराला दुप्पट फायदे होतात. चला जाणून घेऊया दुधासोबत अश्वगंधाचे सेवन केल्याने कोणते फायदे होतात.

( हे ही वाचा: मधुमेह रुग्णांनी नाश्त्यात अंड्यासह ‘या’ गोष्टी खाल्ल्या पाहिजेत; Blood Sugar झपाट्याने होऊ शकते कमी)

अश्वगंधाचे गुणधर्म

औषधी गुणधर्मांनी युक्त अश्वगंधाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-स्ट्रेस आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध, या औषधी वनस्पतीचा शरीराला खूप फायदा होतो.

दुधाचे गुणधर्म

दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, जीवनसत्त्वे ए, डी, के आणि ई भरपूर प्रमाणात असतात. दुधामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि अनेक खनिजे आढळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

(हे ही वाचा: युरिक अॅसिडच्या रुग्णांनी चुकूनही स्नॅक्समध्ये ‘हे’ ५ पदार्थ समाविष्ट करू नका; ते शरीरात विषासारखे काम करतात)

दररोज दुधात अश्वगंधा सेवन केल्याने शरीराला होणारे फायदे

  • रोज रात्री दुधासोबत अश्वगंधाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीर निरोगी राहते.
    या औषधी वनस्पतीचे दुधासोबत सेवन केल्यास हाडे मजबूत राहतात.
  • ज्या लोकांच्या शरीरात कमजोरपणा जाणवतो. त्यांनी अश्वगंधा दुधासोबत घ्यावी, याने शरीरातील कमजोरी दूर होईल.
  • रात्री अश्वगंधा आणि दुधाचे सेवन केल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते.
  • दुधासोबत अश्वगंधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.

अश्वगंधा आणि दुधाचे सेवन कसे करावे?

या औषधी वनस्पतीचे दुधासोबत सेवन करण्यासाठी त्याची वाळलेली मुळे बारीक करून पावडर बनवा. रात्री झोपण्यापूर्वी याचे चार चिमूटभर चूर्ण दुधासोबत घ्या, याने तुम्हाला नक्की फायदा होईल.