Cinnamon Benefits: दालचिनी हा मसाल्याचा प्रकार प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध असतो. जो आपल्या जेवणाची चव वाढवतो. आयुर्वेदानुसार, दालचिनीचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके केला जात आहे. जेवणात दालचिनीचा वापर केल्याने अन्नाला चांगला वास येतो. दालचिनीचा वापर जेवणासोबत चहा आणि काढा बनवण्यासाठी केला जातो. हिवाळ्यात दालचिनीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा मसाला हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शनला प्रतिबंध करतो. याचे सेवन केल्याने घसादुखी आणि सर्दीपासून आराम मिळतो.

अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त दालचिनीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि वजन नियंत्रित राहते. बाबा रामदेव यांच्यानुसार हिवाळ्यात प्रत्येकाने दालचिनीचे सेवन नक्कीच केले पाहिजे. दालचिनी अनेक रोग बरे करते. टीबी आजारात याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, जीवनसत्त्वे ए आणि सी असतात, ज्याचा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदा होतो. दालचिनी तिखट आणि चवीला गोड असते, ती अनेक रोगांच्या उपचारात वापरली जाते. चला जाणून घेऊया दालचिनीच्या सेवनाने कोणते दहा आजार दूर होतात.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू

( हे ही वाचा: दुधासोबत ‘या’ एका गोष्टीचे सेवन केल्यास शरीराला मिळतात ५ आश्चर्यकारिक फायदे; जाणून घ्या याचे सेवन कसे करावे)

१) दालचिनीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन, पोटदुखी आणि छातीत जळजळ यावर दालचिनीचे सेवन खूप प्रभावी ठरते. तुम्ही दालचिनी, सुंठ, जिरे आणि वेलची समप्रमाणात बारीक करून गरम पाण्यासोबत सेवन करू शकता ज्याने तुमची पचनक्रिया ठीक होईल.

२) ५ ग्राम दालचिनी पावडर १ चमचा मधात मिसळून सकाळ, दुपार, संध्याकाळ खाल्ल्यास थंडीमुळे होणाऱ्या संसर्गजन्य तापापासून आराम मिळेल.

३) दालचिनीचे सेवन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरते. साखरेच्या रुग्णांनी दुधासोबत दालचिनीचे सेवन केल्यास फायदा होईल.

४) दालचिनी पावडर हिवाळ्यात डोकेदुखीपासून आराम देते. दालचिनीचे ८ ते १० तुकडे बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट कपाळावर लावा, डोकेदुखीपासून लगेच आराम मिळेल.

( हे ही वाचा: Diabetes Symptoms: मधुमेहाची पातळी २०० mg/dL पेक्षा जास्त झाल्यास हातामध्ये दिसू लागतात ‘ही’ ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे)

५) सर्दी, खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवायचा असेल तर दालचिनीचे सेवन करा. तुम्ही चहासोबत दालचिनीचे सेवन करू शकता किंवा त्याचा काढा बनवू शकता.

६) दालचिनीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. ज्या लोकांना वाईट कोलेस्ट्रॉल वाढले आहे ते दालचिनीचा काढा बनवून सेवन करू शकता.

७) वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर दालचिनीचे सेवन करा. दालचिनीचा काढा करून सेवन केल्यास वजन झपाट्याने कमी करता येते.

८) बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास दालचिनीचे पाणी प्या. हे पाणी मळमळ, उलट्या आणि जुलाब रोखण्यासाठी खूप प्रभावी आहे.

( हे ही वाचा: Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा)

९) जर मुलाला फिडिंग करत असाल, तर दालचिनीचा तुकडा चावल्याने, दुधाचे उत्पादन जास्त होईल.

१०) दिवसभरात एक चमचा दालचिनीचा वापर केल्याने तुम्ही हृदयविकार टाळू शकता.

Story img Loader