आपल्या प्रत्येकाची जीवनशैली अत्यंत व्यस्त आहे. इतकी व्यस्त कि आपल्याला व्यायाम आणि योग्य आहाराकडे लक्ष देण्यासाठी देखील सहसा वेळ मिळत नाही. परिणामी आपल्या आरोग्यासाठी ते अपायकारक ठरतं. मग ह्यावर उपाय काय? जर तुम्ही नियमितपणे जिममध्ये जाऊ शकत नसाल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणं तुम्हाला शक्य होतं नसेल तर तुम्ही कोणताही मैदानी खेळ खेळू शकता किंवा तुमच्या आरोग्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर चालण्यासारखा सोपा सरळ मार्ग देखील मोठा फायदेशीर ठरू शकतो. ज्याला आपण ‘शतपावली’ असं म्हणतो. शतपावलीमुळे विशेषतः आपली झोपण्याची वेळ आणि रात्रीच्या जेवणातील अंतर वाढतं जे अत्यंत आवश्यक आहे. याचसोबत याचे अनेक फायदे आहेत. आज आपण हेच फायदे नेमके कोणकोणते आहेत? याबाबत जाणून घेऊया.

  • पचनशक्ती सुधारते

रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने आपल्या शरीराला अधिक गॅस्ट्रिक एंजाइम तयार करण्यास अनुमती मिळते आणि पोटाला हे शोषून घेतलेले पोषक घटक आत्मसात करण्याची सूचना मिळते. यामुळे आपली पचनशक्ती सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्यांपासून आपण दूर राहतो

Health Benefits Of Anjeer
Health Benefits Of Anjeer : सकाळी रिकाम्या पोटी खा अंजीर; लगेच दूर होतील ‘या’ पाच समस्या
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
poor sleep make your brain age faster
कमी झोपेमुळे मेंदू वेळेआधी वृद्ध होतो? नवीन अभ्यास काय सांगतो?
what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
When vs what you eat: Find out if one matters more than the other the ideal right time to consume breakfast lunch and dinner
जेवणाच्या वेळेवरून ठरते वजनाचे गणित; दुपारचे जेवण कधी करावे, १२, १ की २? जाणून घ्या नाश्ता, लंच आणि डिनरची योग्य वेळ
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
This is when you should have your last meal of the day
तुम्ही दिवसभरातील शेवटचे जेवण कोणत्या वेळी केले पाहिजे? तज्ज्ञांनी केला खुलासा
Painkillers side effects advantage disadvantage overusing painkillers harming your stomach and kidney
डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलर घेताय? अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
  • वजन कमी करणाऱ्यांसाठी उपयुक्त पर्याय

आपली चयापचय शक्ती वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी फिरायला जाणं. हे आपल्याला विश्रांतीच्या वेळी अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करेल आणि आपले शरीर चांगल्या स्थितीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. याचा दुसरा अर्थ, रात्रीच्या जेवणानंतर चालणं हा वजन कमी करणाऱ्यांसाठी एक उपयुक्त पर्याय आहे.

  • प्रतिकारशक्ती वाढते

रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने आपली पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. यामुळे तुमचे अंतर्गत अवयव चांगले कार्य करतात आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढते. मजबूत प्रतिकारशक्ती विविध संक्रमणांना दूर ठेवण्यात मदत करते. ज्यात कोविड -19 सारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे.

  • साखरेची पातळी नियंत्रणात राहते

रक्तातील साखरेची वाढ ही जेवणानंतर साधारणतः ३० मिनिटांनी सुरू होते. पण जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर फिरायला गेलात तर काही प्रमाणात ग्लुकोज शरीर वापरतं. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

  • मिडनाईट स्नॅकिंग/क्रेविंग बंद करते

पूर्ण जेवण झाल्यानंतर तुम्ही अनेकदा पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होते का? मग रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्याचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. मिडनाईट स्नॅकिंग करणं अत्यंत अपायकारक असतं. जर तुमचं पोट आधीच भरलेलं असेल तर हे मिडनाईट स्नॅकिंग तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा आणू शकतं. म्हणूनच, जेवणानंतर चालणं तुम्हाला अधिक समाधानी बनवतं आणि रात्री कोणत्याही प्रकारच्या क्रेविंग होऊ देत नाही.

  • मानसिक आरोग्य सुधारते

रात्रीच्या जेवणानंतर चालणं देखील तुमच्या मानसिक आरोग्य राखण्यासाठी देखील फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास समस्या जाणवत असेल तर रोज रात्री जेवणानंतर फिरायला जा. तुम्हाला लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील.

  • तणावापासून मुक्त ठेवते

इतकेच नव्हे तर चालणं आपला तणाव दूर करण्यास आणि आपल्या शरीरातील एंडोर्फिन रिलीज करण्यास देखील मदत करत. यामुळे तुम्हाला बरं वाटतं आणि तुमचा मूड देखील चांगला राहतो. त्यामुळे, रात्रीच्या जेवणानंतर चालणं तुम्हाला आनंदी ठेवू शकतं आणि तुम्ही नैराश्यावर मात करू शकता.