बदाम हे असेच एक ड्राय फ्रूट आहे ज्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच बदाम तेल त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदामाच्या तेलाचा उपयोग प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. बदाम तेल त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम होते आणि चमकते.
बदाम हे व्हिटॅमिन ए, ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि जस्त यांचा उत्कृष्ट स्रोत आहे जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. या सर्व गोष्टी त्वचा निरोगी करण्यासाठी काम करतात. बदाम तेलाच्या या गुणधर्मामुळे याचा वापर कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. चला जाणून घेऊया बदामाच्या तेलाचे कोणते फायदे आहेत.
डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे कमी करते
तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर तुम्ही बदामाचे तेल वापरावे. बदामाच्या तेलाचे दोन थेंब प्रभावित भागात दररोज रात्री लावून हलक्या हाताने मालिश केल्यास खूप फायदा होतो. बदामाच्या तेलामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि डोळ्यांखालील सूज कमी होते. तसेच कोरड्या त्वचेसाठी बदामाचे तेल सर्वोत्तम उपचार आहे.
सुरकुत्या दूर करते
व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम तेल त्वचेवरील सुरकुत्या दूर करते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा आणि रात्रभर असेच राहू द्या. असे रोज केल्याने सुरकुत्या कमी होतील. मालिश करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुवा.
मुरुमाची समस्या दूर होते
बदामाच्या तेलामध्ये फॅटी ऍसिड असतात जे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतात. तसेच ज्यांच्या त्वचेवर मुरुमाची समस्या आहे. त्यांनी बदामाचे तेल वापरणे आवश्यक आहे. यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेतून बॅक्टेरिया काढून टाकण्याचे आणि आतून छिद्र साफ करण्याचे काम करतात.
Hair Care: ‘या’ सोप्या पद्धतीने तुम्ही मिळवू शकता लांब दाट केस, अशी घ्या काळजी
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते
बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते.
चेहऱ्यावरील डाग दूर करतात
बदामाचे तेल चेहर्यावर लावल्याने चेहर्यावरील डाग कमी होतात. तसेच या टेलमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचा मुलायम होण्यास मदत करते. शिवाय बदाम तेलामुळे चेहऱ्याला पोषण तत्त्वांचा पुरवठाही होतो.