स्वयंपाक करताना जितकी चव महत्त्वाची असते तितकीच स्वच्छता देखील महत्त्वाची असते. ही स्वच्छता ओट्याची असो किंवा भांड्याची. स्वयंपाक करताना वापरली जाणारी अशी अनेक भांडी आहे जी घासताना खूप त्रास होतो. जसे की, मिक्सरचे भांडे, कुकरचे झाकण असो किंवा चहाची गाळणी. मिक्सरचे भांडे, कुकरचे झाकण भांडी कितीही साफ केली तर कुठे ना कुठे काही ना काही अन्नाचे कन्न मागे राहतात आणि चहाची गाळणी तर इतकी खराब होऊन जाते की त्यातून चहाच गाळता येत नाही.

तुम्ही जर घरात रोज चहा बनवत असाल तर तुम्हाला हे कदाचित माहित असेल की, चहाची गाळण साफ करण्यासाठी अनेकदा चहाची गाळण गॅसवर ठेवून जाळली जाते. जेणेकरून गाळणीमध्ये अडकलेली चहापावडर जळून जाईल आणि गाळणीचे छिद्र मोकळे होतील. पण त्यामुळे चहाची गाळण देखील काळी पडू लागते आणि गाळण खराब होते. त्यामुळे वारंवार चहाची गाळण बदलावी लागते. तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर चहाची गाळण साफ करण्याच्या इतर पद्धत वापरू शकता. चहाची गाळण गॅसवर न जाळता साफ करण्याची पद्धत जाणून घ्या….

हेही वाचा – Monsoon foods : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? डॉक्टरांकडून घ्या जाणून….

Viral Video Of Bride And Her Brother
VIDEO: भर लग्नात भावाने बहिणीची सांगितली हटके सवय; नवऱ्याचे उत्तर ऐकून नवरी झाली लाल, नेटकरी म्हणाले “सात वचनांमध्ये…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
How to prevent oil splashing when frying Chillies
मिरची तळताना तेल अंगावर उडते? हुशार सुनबाईंनी शोधला भन्नाट जुगाड, Viral Video पाहून बघाच
be aware about three scam while filling petrol on petrol pump
Video : पेट्रोल भरताना तुमच्याबरोबर होऊ शकतात हे तीन स्कॅम; पेट्रोल पंपावर या गोष्टींची घ्या काळजी
Kitchen Jugaad Video
Kitchen Jugaad Video: फक्त एक वाटी मिठाच्या मदतीने काळी पडलेली तांब्या-पितळेची भांडी हात न लावता करा चकाचक
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
Shocking Video of Kettle caught fire while boiling the water viral video on social media
तुमच्याही घरात पाणी गरम करण्यासाठी ‘हे’ इलेक्ट्रिक उपकरण वापरत असाल, तर हा VIDEO नक्की बघा; पाणी गरम करताना १०० वेळा विचार कराल
Gas cylinder empty mistake gas stove catches fire shocking video viral on social media
महिलांनो तुम्हीही गॅस सिलिंडर संपल्यावर असंच करता का? किचनमधली ‘ही’ चूक बेतेल जीवावर, VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

चहाची गाळण साफ करण्याची भन्नाट ट्रिक

  • सर्व प्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करा. पाणी गरम झालं की, त्यामध्ये भांडे घासण्याचे लिक्वीड टाका.
  • त्यात बेकिंग सोडा टाका आणि लिंबाचा रस टाका. एक मिनिटे पाणी उकळून घ्या.
  • त्यात चहाची गाळण काही वेळ ठेवा.
  • त्यानंतर टुथपेस्ट वापरून चहाची गाळण ब्रशने घासून घ्या.
  • चहाची गाळणीचे कोणतेही नुकसान न होता एकदम नव्यासारखी साफ होईल.

हेही वाचा –पावसाळ्यात घरातच काय घराभोवतीही फिरणार नाहीत डास, कीटक अन् माश्या; करा फक्त ‘हे’ ५ सोपे उपाय

इंस्टाग्रामवर simply.marath नावाच्या पेजवर ही भन्नाट ट्रिक सांगितली आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करून ही ट्रिक सांगितल्या बद्दल आभार व्यक्त केले. एकाने लिहिले, चहाची गाळणी साफ करण्याची खूर चांगली ट्रिक आहे.

तुम्ही स्वत: ही ट्रिक वापरून पाहा आणि ठरवा ही उपयूक्त आहे की नाही.

Story img Loader