करोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने प्रजासत्ताक दिनाचा सेल काही दिवस आधी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या वर्षी ग्राहकांना चार ते पाच दिवस आधी स्वस्तात वस्तू घेण्याची संधी मिळणार आहे. करोना निर्बंधामुळे पुरवठा साखळी आणि वितरणावर थेट परिणाम झाल्याने हा निर्णय घेतल्याचं कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी साठा तयार ठेवला असून त्याचा सेल १६ किंवा १७ तारखेला सुरु होईल. दरवर्षी हा सेल २० तारखेनंतर सुरु होतो. मात्र यंदा १६ तारखेला सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदाचा सेल खूप दिवस चालेल असं वृत्त इकोनॉमिक्स टाइम्सने दिलं आहे. सुपर प्लास्ट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अवनीत सिंग मारवाह यांनी सांगितले की, ऑनलाइन विक्री गेल्या काही दिवसात वेगाने वाढली आहे. करोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यांकडून कठोर निर्बंध येण्याची भीती आहे. त्यामुळे पुरवठा साखळी आणि वितरण प्रभावित होऊ शकते. ऑफलाइन स्टोअर स्टोअरची विक्री आधीच घसरली आहे. अशा प्रकारे, त्यांचा सध्याचा व्यवसाय ऑनलाइन रूपांतरित करण्याची त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.” दुसरीकडे ई-कॉमर्स कंपन्यानी विक्रीत विलंब केल्यास त्याचा परिणाम वितरण साखळीवर होईल, असं वाटत आहे. त्यामुळे काही दिवसांआधीच विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Chanakya Niti: चाणक्य यांच्या चार गोष्टी लक्षात ठेवा; कधीच भासणार नाही आर्थिक चणचण
भारतातील करोना रुग्णवाढीचा वेग कायम आहे. देशात रविवारी नवीन करोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे गेला. गेल्या काही महिन्यांत एका दिवसात सापडलेल्या करोना बाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी १,७९,७२३ नवीन करोना रुग्ण आढळले. त्याच वेळी ४६,५६९ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे १४६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. देशातील डेली पॉझिटिव्हीटी रेट १३.२९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ७,२३,६१९ आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ४५ लाख १७२ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या दोन वर्षात ४,८३,९३६ लोकांना या संसर्गजन्य आजाराने आपला जीव गमवावा लागला आहे.