स्मार्ट स्पीकरच्या शर्यतीत गुगल आणि अॅमेझॉन या दिग्गज कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरू आहे. दोन कंपन्यांमधील स्पर्धेमुळे ग्राहकांसमोर दोन नवीन आणि दर्जेदार कनेक्टेड होम प्रोडक्ट्सचे (Google Nest MINI आणि Amazon Echo Dot ) पर्याय ग्राहकांना मिळालेत. यातील कोणता स्मार्ट स्पीकर तुमच्यासाठी योग्य आहे, Google नेस्ट ऑडिओ आणि अॅमेझॉन इकोची वैशिष्ट्ये काय आहेत याबाबत आज आपण माहिती घेऊयात.
Google Nest ऑडिओ आणि अॅमेझॉन इको डॉट दोन्हीही स्मार्ट होम डिव्हाइस आहेत. दोन्ही डिव्हाइसची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सही जवळपास सारखीच आहेत. पण दोन्ही डिव्हाइसमध्ये थोडा फरकही आहे. फोर्थ जनरेशन इको डॉटमध्ये 1.6- इंच स्पीकर असून एखाद्या मोठ्या स्पीकरला कनेक्ट करता येतो. अॅडव्हान्स ब्लूटूथ ऑडिओ सपोर्ट, व्हॉइस कंट्रोल आणि 3.5mm ऑडिओ जॅकसह इको डॉट कमी किंमतीतील अॅलेक्सा कंट्रोलर आहे. तर, गुगल नेस्टमध्ये व्हॉइस डिटेक्शनसाठी तीन माइक्रोफोन आणि 1.57 इंच स्पीकर देण्यात आला आहे. याला ब्लूटूथ सपोर्ट आहे, परंतु डिव्हाइसमध्ये ऑडिओ पोर्टचा अभाव आहे . मात्र, यात गुगल असिस्टंटचा सपोर्ट मिळेल.
हार्डवेअर कनेक्टिव्हिटीशिवाय दोन्ही डिव्हाइसमध्ये न्यूज रिपोर्ट, रेसिपी, तिकीट आरक्षण, जोक्स, प्रश्नोत्तरे असे अनेक फिचर्स आहेत. या फिचर्सच्या बाबतीत इको डॉट थोडाफार सरस ठरतो. पण गुगलही यामध्ये हळूहळू विस्तारत आहे. गुगलने बहुभाषीक, ट्रांसलेटर आणि स्टेप-बाय-स्टेप कूकिंग यांसारखे काही फिचर्स नुकतेच जोडले आहेत.
दुसरीकडे एमेझॉन एलेक्सावर आता स्पॉटीफाय प्रीमियम, अॅपल म्यूझीक, पांडोरा, ट्यूनइन रेडिओ आणि आयहार्टरेडिओ या म्यूझीक प्लॅटफॉर्म्सचाही सपोर्ट मिळत आहे. तर, गुगल नेस्ट मिनीवर म्यूझीकसाठी थोडे कमी पर्याय आहेत. पण तरीही स्पॉटीफाय, डीझर, युट्यूब आणि गुगल प्ले म्यूझीकचा सपोर्ट गुगल नेस्ट मिनीला आहे. दोन्ही कंपन्या अधिकाधिक प्लॅटफॉर्म्सचा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्मार्ट स्पीकर खरेदी करण्यापूर्वी आपल्याला एक बाब माहित असली पाहिजे की, अॅमेझॉन अलेक्सा आणि गूगल असिस्टंट या दोघांमध्ये सतत बदल होत आहेत. याचा अर्थ असा की दोन्ही डिव्हाइस नियमितपणे नवीन वैशिष्ट्यांसह अपडेट होत असतात. त्यामुळे एखादा डिव्हाइस खरेदी केल्यावर दुसऱ्या डिव्हाइसमधील फीचर पाहून कदाचित निराशा पदरी पडू शकते, म्हणून स्मार्ट स्पीकर विचारपूर्वक खरेदी करा.