Amazon Mango Fiesta: उन्हाळ्यामधल्या सगळ्यांच्या आवडत्या ‘आंब्यांचे’ स्वागत करण्यासाठी अॅमेझॉन फ्रेशने आज मँगो फिएस्टाची घोषणा केली आहे. हा महोत्सव सुरु झाला आहे आणि मे २०२२ च्या अखेरपर्यंत सुरू असेल. ग्राहक कार्बाइड मुक्त, सुरक्षितपणे पिकवलेले आणि उच्च दर्जाचे ताजे आंबे निवडू शकतात ज्यामधे सफेदा, बंगनपल्ली, बदामी, सिंधुरा, थोतापुरी, अल्फान्सो आणि इतरांचा समावेश आहेत. अॅमेझॉन फ्रेश बंगळुरूमधील ग्राहकांसाठी कर्नाटक अल्फान्सो, कलापड व रासपुरी आणि कोलकातामधील ग्राहकांसाठी गुलाबखास व पर्कल्मन सारख्या प्रादेशिक आवडीच्या जातीचे आंबे ऑफर करेल. ग्राहक अस्सल आंब्याचा आनंद जसे रत्नागिरी अल्फान्सो, देवघड अल्फान्सो, ऑरगॅनिक अल्फान्सो आणि प्रीमियम केसरयुक्त आंबे थेट रत्नागिरीमध्ये अॅमेझॉन कलेक्शन सेंटरमधून घेऊ शकतात.

खास डिस्काऊंट ऑफर

ग्राहक खरेदीच्या दरम्यान बँक ऑफर, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्सवर १०% पर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळवू शकतात. बंगळुरू, दिल्ली, फरिदाबाद, गुडगाव, गाझियाबाद, नोएडा, अहमदाबाद, म्हैसूर, जयपूर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, पुणे, कोलकाता आणि चंदीगड सह टॉप १५ पेक्षा जास्त शहरांमधील ग्राहकांना सकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत दोन ते तीन तासांच्या डिलिव्हरी स्लॉटमध्ये उच्च-दर्जाच्या ताज्या आंब्याचा आनंद घेता येईल.

Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला

फ्रेश अल्फान्सो मँगो – मलईदार अल्फान्सो आंबे अत्यंत सुगंधी असतात आणि गोडपणा, भरघोसपणा आणि चवीच्या बाबतीत फळांच्या सर्वात जातीपैकी उत्कृष्ट मानले जातात. आंब्याचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो कारण त्याला सहज कट आणि स्लाइस केल जाऊ शकतो, त्याचा उपयोग शेक, ज्युस, सॅलड बनवण्यासाठी केला जाऊ शकतो आणि आइस्क्रीम व इतर मिष्टान्नांसह सर्व्ह करता येतो. हे आंबे थंड आणि कोरड्या जागी सुरक्षित ठेवावे.

रसाळ बदामी मँगो – बदामी आंबा एक फिकट पिवळा रंगाचा आणि हलक्या पातळ त्वचेचे फळ असल्यामुळे त्यातील गर सहजपणे ओळखता येते. फळातील गर हे आकर्षक पिवळ्या ते केशरी रंगाचे असून फळ गोड आणि रसाळ असून अप्रतिम चवीचे असते. त्याचे टुकडे कापुन किंवा प्रत्यक्ष त्याचा पल्प चोखून आनंद घेता येतो. तुम्ही हे ज्युस किंवा लस्सीच्या रूपात देखील पेऊ शकता.

व्हिटॅमिन युक्त सफेदा/बंगनपल्ली मँगो – अॅमेझॉनवर उपलब्ध असलेले सफेदा आंबे नैसर्गिकरित्या पिकल्या जातात आणि १००% कार्बाईड फ्री असतात. या समर डीलाइटमध्ये व्हिटॅमिन ए, सी, लोह, फोलेट आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात आणि ते चमकदार पिवळ्या रंगात आढळतात.

गोल्डन ब्यूटी, थोथापुरी मँगो – हे आंबे मोठे आणि सोनेरी पिवळ्या रंगाचे असतात. त्यांचा आकार लंबवर्तुळाकार असतो व त्याला चोचीसारखे टोकदार टोक असते. फळाची त्वचा सामान्यत: जाड असते आणि रंग हिरव्या ते पिवळ्या रंगात बदलू शकतो.

गोड सिंधुरा (लालबाग) मँगो – सिंधुरा आंबा आकाराने लांबट आणि लाल, हिरव्या रंगाचा असतो. हे त्याच्या अत्यंत गोडपणामुळे आणि चवीमुळे मध आंबा म्हणून देखील ओळखला जातो.

आंब्यामध्ये २० हून अधिक विभिन्न जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ताजे आंबे थेट शेतातून खरेदी केले जातात आणि आंबे उत्तम प्रकारे आहेत याची खात्री करण्यासाठी एफएसएसएआय अनुरूप सुविधांनुसार वर्गीकरण आणि श्रेणीबद्ध केले जातात. या उन्हाळ्यात, मे महिन्याच्या शेवटपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शेवटी उत्तम किंमतीमध्ये विविध प्रकारच्या ताज्या पिकलेल्या आंब्यांचा आनंद घ्या.