अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल परतला आहे. २० ते २३ जानेवारी २०१९ दरम्‍यान हा सेल आयोजित करण्यात आला आहे. प्राइम सदस्‍यांसाठी १२ तास अगोदरच १९ जानेवारी २०१९ दुपारी १२ वाजल्‍यापासून डिल्‍सची सेवा देण्‍यात येणार आहे. लोकप्रिय ब्रॅण्‍ड्सवर आकर्षक डिल्‍स, जलद डिलिव्‍हरी आणि सुलभ परताव्‍यांसह ग्राहक Amazon.in वरील शेकडो विभागांमधील १७० दशलक्षहून अधिक उत्‍पादनांमधून खरेदी करू शकतात.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्‍ये स्‍मार्टफोन्‍स, कन्‍झ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फॅशन, होम अॅण्‍ड किचन, मोठी उपकरणे, दैनंदिन आवश्‍यक वस्‍तू अशा उत्‍पादनांच्‍या व्‍यापक रेंजवर आकर्षक डिल्‍सची सेवा देण्‍यात येणार आहे. डेबिट व क्रेडिट कार्ड्स आणि बजाज फिनसर्व कार्ड्सवर नो-कॉस्‍ट ईएमआय, जलद डिलिव्‍हरी व उपकरणांचे इन्‍स्‍टॉलेशन, मोबाइल फोन्‍स व मोठ्या उपकरणांचे एक्‍स्चेंज, त्‍वरित बँक सूट अशा सेवांसह ग्राहक Amazon.inवर या आकर्षक सेलचा लाभ घेऊ शकतात. ग्रेट इंडियन सेलदरम्‍यान खरेदी करणारे ग्राहक एचडीएफसी बँक डेबिट व क्रेडिट कार्ड्स आणि ईएमआयवर अतिरिक्‍त १० टक्‍क्‍यांची त्‍वरित सूट प्राप्‍त करू शकतात. ग्राहक बजाज फिनसर्व ईएमआय कार्ड आणि निवडक डेबिट व क्रेडिट कार्ड्सचा वापर करत नो-कॉस्‍ट ईएमआयवर १० कोटींहून अधिक उत्‍पादनांमधून खरेदी करू शकतात.

ग्रेट इंडियन सेलदरम्‍यान खरेदी करणारे ग्राहक अॅप्‍पल, वनप्‍लस, शाओमी, ऑनर, रिअलमी, सॅमसंग, १०.ऑर, पुमा, रेड टेप, बाटा, मदरकेअर, व्‍हेरो मोदा, फास्ट्रॅक, जॉयलुकास, टाइमेक्‍स, स्‍कायबॅग्‍ज, अॅरो, एलजी, व्‍होल्‍टास, बीपीएल, एचपी, कॅनन, हॉट व्‍हील्‍स, पॅम्‍पर्स, सर्फ एक्‍सेल, लॅक्‍मे,फिलिप्‍स, प्रेस्टिज, उषा, बॉम्‍बे डाईंग व अशा इतर मोठ्या ब्रॅण्‍ड्सवर मोठी बचत प्राप्‍त करू शकतात. अॅमेझॉन बेसिक्‍स, सोलिमो, सिम्‍बॉल, मिक्‍स,वेदाका, प्रेस्‍टो अशा अॅमेझॉन ब्रॅण्‍ड्सवर खास ऑफर्स उपलब्‍ध असतील. ग्राहकांना अॅमेझॉन इको, फायरटीव्‍ही स्टिक आणि किंडल ईरीडर्स अशा अॅमेझॉन डिव्हाइसवर ३००० रूपयांची सूट देखील मिळवण्याची संधी आहे.

ग्राहक सेलदरम्‍यान देशातील अद्वितीय, अस्‍सल हातमाग उत्‍पादनांच्‍या रेंजवर खास ऑफर्स प्राप्‍त करू शकतात, जसे आग्रामधील इकत, बनारसी,तंत साड्या व लेदर शूज. ग्राहक अॅमेझॉन सहेली अंतर्गत महिला उद्योजकांनी सादर केलेली ऑफिस स्‍टेशनरी व किराणा मालासारख्‍या उत्‍पादनांचा देखील लाभ घेऊ शकतात.

Story img Loader