तुमचाही आयफोन खरेदी करण्याचा विचार सुरू आहे? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इ-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सध्या ‘अॅपल फेस्ट’ सुरू आहे, जिथे तुम्हाला ‘आयफोन ७’, ‘आयफोन ६’, ‘आयफोन ६ प्लस’वर आकर्षक सवलत मिळणार आहे . ९ डिसेंबरपर्यंत हा फेस्ट सुरू राहणार असून यामध्ये डिस्काउंट ऑफर्ससोबतच एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय, कॅशबॅक यांसारख्या ऑफरही आहेत. त्यामुळे अॅपल फोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
अॅपल फेस्टमध्ये ३२ जीबी ‘आयफोन ६’ हा फोन २५, ९९० रुपयांना तर ३२ जीबी ‘आयफोन ७’ ४१, ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या दोन्ही फोनची बाजारातील किंमत ही सध्याच्या घडीला अनुक्रमे २९,९५० आणि ४९,००० अशी आहे. ३२ जीबी ‘आयफोन ६ एस’ हा फोन अॅपल फेस्टमध्ये ३६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. ज्याची किंमत ४०,००० रुपये आहे.
वर्षभरापूर्वी लाँच झालेल्या ‘आयफोन ७’ च्या १२८ जीबी आणि २५६ जीबी व्हेरिएंटवरही आकर्षक सवलत आहे. हे दोन्ही व्हेरिएंट अनुक्रमे ५१, ९९९ रुपये आणि ५३,९९९ रुपयांना ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आयफोन ७ खरेदी करणाऱ्यासाठी ही चांगली ऑफर ठरू शकते. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन खरेदी करत असाल तर जवळपास साडे नऊ हजारांहून अधिक रुपयांपर्यंतची सवलत तुम्हाला मिळेल. अर्थात तुमचा फोन किती चांगला आहे यावर ती किंमत उपलब्ध आहे.