अॅमेझॉनचा २६ जुलै रोजी प्राइम डे सेल सुरु होणार आहे, जो २७ जुलैपर्यंत चालेल. ई-कॉमर्स जायंट आश्वासन देत आहेत की ग्राहकांना इको, फायर टीव्ही, किंडल, अ‍ॅलेक्सा बिल्ट इन आणि स्मार्टवर चांगल्या ऑफर्स मिळतील. लॅपटॉप, स्मार्टफोन, प्रिंटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही ऑफर्स आणि सूट पाहायला मिळतील. म्हणून, जर आपण नवीन स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप सारखे कोणतेही गॅजेट्स घेण्याचा प्लॅन करत असाल तर  थोडा वेळ थांबा, सेलची प्रतीक्षा करा. बाकीच्या वस्तू प्रमाणे अॅमेझॉन उत्पादनांवरही सवलती आहेत. काही ठराविक बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे प्राइम डे खरेदीवर काही टक्के सूट आहे तर रीवॉर्ड गुणही मिळणार आहेत.

अॅमेझॉन उत्पादनांवर सवलत देण्याकरिता प्राइम डे सेल

सेलमध्ये एक कॉम्बो ऑफर आहे, ज्यामध्ये अॅमेझॉन इको डॉट स्पीकर व स्मार्ट कलर बल्बसह किंमत २,२९९ रुपयांच्या सूट दराने विक्री करणार आहे. हे अॅमेझॉनचे तिसऱ्या जनरेशनमधील प्रोडक्ट आहेत. सध्या हे प्रोडक्ट साइटवर ३,५९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. किंडलच्या श्रेणीवर ४,००० रुपयांपर्यंतची सवलत देखील असेल.अ‍ॅमेझॉनने सर्व ऑफर्स जाहीर केलेल्या नाहीत. कंपनी आश्वासन देत आहे की ग्राहकांना इको स्मार्ट स्पीकर्स आणि स्मार्ट डिस्प्लेवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. सेलदरम्यान, वनप्लस यू टीव्ही मालिकेचे कोणतेही मॉडेल विकत घेतल्यास अ‍ॅमेझॉन विनामूल्य एक इको डॉट स्पीकर (3rd gen) देईल.हाच स्पीकर अ‍ॅमेझॉनबासिक्स फायर टीव्ही एडिशन ४ के स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदीसाठीवरही देणार आहे, परंतु आपल्याला स्पीकरसाठी ९९९ रुपये द्यावे लागतील. हा एलईडी टीव्ही सध्या साइटवर ३४,९९९ रुपयांमध्ये आहे, परंतु विक्रीच्या वेळी ५०टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. ४ के स्मार्ट एलईडी टीव्ही ५० इंच आणि ५५ इंचासह दोन आकारात उपलब्ध आहे. हे डॉल्बी व्हिजन, फायर टीव्ही ओएस आणि बिल्ट-इन अलेक्साला सपोर्ट करते. निवडक स्मार्ट टीव्ही आणि एसी खरेदीवर, थर्ड जेन इको डॉट स्पीकर देखील १,४९९ रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर उपलब्ध असेल. या सेलमध्ये वनप्लस आणि शाओमीच्या अलेक्सा इन बिल्ड स्मार्टफोनवरील डील्सचादेखील समावेश आहे.

लॅपटॉप, स्मार्टफोनसह इतर गॅजेट्सवर सूट

सेलमध्ये फोनवर ४० टक्के सूट, लॅपटॉपवर ३५,००० रुपयांपर्यंत आणि स्पीकर्स व हेडफोनवर ७०  टक्क्यांपर्यंत ऑफर आहेत. अ‍ॅमेझॉननुसार स्मार्टवॉचवर ५० टक्के सूट, टॅबलेटवर ७५ टक्क्यांपर्यंत आणि प्रिंटरवर ५० टक्क्यांपर्यंत सूट असेल. ई-कॉमर्स जायंटने ग्राहकांना १० टक्के त्वरित सवलत देण्यासाठी एचडीएफसी बँकेबरोबर भागीदारी देखील केली आहे. ज्यांच्याकडे प्राइम मेंबरशिप आहे त्यांना अ‍ॅममेझॉन वरती आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे प्राइम डे खरेदीवर ५ टक्के रीवॉर्ड गुणही मिळतील.

Story img Loader