ई कॉमर्स वेबसाईट असलेली अॅमेझॉन कंपनी आपल्या ग्राहकांना एक अनोखी संधी देत आहे. यामध्ये ग्राहकांनी काही प्रश्नांची उत्तरे दिल्यास त्यांना Fire TV Stick जिंकता येणार आहे. ही स्पर्धा जिंकणे अतिशय सोपे असून त्यासाठी ग्राहकांना अतिशय सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. यासाठी सुरुवातीला ग्राहकांना आपल्या मोबाईलवर अॅमेझॉनचे अॅप डाऊनलोड करावे लागेल. यामध्ये साईन-इन केल्यावर होम पेडवरच डेली क्विजचा बॅनर दिसेल. ही संधी सकाळी ८ वाजल्यापासून सकाळी १२ पर्यंत उपलब्ध असेल. यामध्ये ग्राहकांना ५ प्रश्न विचारले जातील. त्यांची योग्य उत्तरे दिल्यानंतर तुम्ही लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊ शकता तुमचे नशीब चांगले असेल तर तुम्हाला बक्षीस म्हणून अॅमेझॉन फायर टीव्ही स्टीक मिळू शकेल.

या स्पर्धेत विजयी झालेल्यांची नावे २८ फेब्रुवारी किंवा त्याआधी जाहीर केली जाणार आहेत. विजेत्यांना ई-मेल आणि मेसेजद्वारे ते जिंकल्याची माहिती दिली जाईल. या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तुम्ही अॅमेझॉनच्या मेलिंग लिस्टमध्ये सहभागी व्हाल. म्हणजेच अॅमेझॉन तुम्हाला प्रमोशनल ई-मेल पाठवू शकेल. तुम्हाला ही सुविधा नको असेल तर तुम्ही ही सुविधा डिअॅक्टिव्हेटही करु शकता. तुम्ही जर विजेते म्हणून घोषित झालात तर तुम्हाला तुमची ओळख पटवून द्यावी लागणार आहे. यासाठी पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, वोटर आयडी किंवा पासपोर्ट यांपैकी एक कागदपत्र देऊ शकता. तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे बक्षीस जिंकले असेल तर पॅन कार्ड देणे बंधनकारक असेल. कंपनीकडून मिळणाऱ्या उत्पादनावर कोणत्याही प्रकारची वॉरंटी मिळणार नाही. तसेच कंपनीकडून बक्षीसाच्या ऐवजी पैसे दिले जाणार नाहीत. ठरलेले बक्षीस देण्यास कंपनी असमर्थ असेल तर दुसरी एखादी वस्तू मिळणार आहे.

Story img Loader