रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. येत्या रविवारी म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या दिवशी निश्चितच आपण आपल्या भावाला/बहिणीला नेमकी काय भेटवस्तू द्यायची? यासाठी तुमची शोधाशोध सुरु झालीच असेल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी रक्षाबंधनाच्या भेटवस्तूंसाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत. आता सण आला म्हणजे ऑफर्सही आल्याच. अ‍ॅमेझॉनने देखील रक्षाबंधनाचं औचित्य साधून आपल्या ‘राखी स्टोअर’ची घोषणा केली आहे. यामध्ये विविध कॅटेगरीजमधील उत्पादनांवर अनेक सवलती दिल्या जात आहेत. फॅशन, ब्युटी, स्मार्टफोन, टीव्ही, घरगुती उत्पादने अशा अनेक कॅटेगरीजमधील अगदी चांगल्या सवलतीत विकल्या जात आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच काही  उत्तम स्मार्टफोन आणि इतर उत्पादनांच्या पर्यायांबद्दल सांगणार आहोत जे या अ‍ॅमेझॉन राखी स्टोअर ऑफरअंतर्गत कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेडमी नोट १० प्रो मॅक्स

अ‍ॅमेझॉनच्या या रक्षाबंधन सेलमध्ये रेडमी नोट १० प्रो मॅक्सचा (Redmi Note 10 Pro Max) ६ जीबी रॅम व्हेरिएंट फक्त १९,९९९ रुपयांना या खरेदी करता येणार आहे. यात ६.६७ इंच सुपर AMOLED स्क्रीन आहे. त्यासोबत यात ६ जीबी रॅमसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसर आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सेलचा आहे. तर यात ३३२० फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०२०mAh ची बॅटरी आहे.

वनप्लस नॉर्ड सीई ५ जी

अ‍ॅमेझॉन राखी स्टोअरवर वनप्लस नॉर्ड सीई ५ जी (OnePlus Nord CE 5G) ग्राहकांसाठी २२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनमध्ये ६.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनच्या मागच्या बाजूला ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी ५ जी प्रोसेसर आहे.

वनप्लस बड्स झेड

अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये ग्राहक वनप्लस बड्स झेड (OnePlus Buds Z) फक्त २,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. या इयरबड्समध्ये १० एमएम डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की, यात डीप बेस डेफिनेशन मिळतं.

फायर टीव्ही स्टिक थर्ड जनरेशन

पूर्ण एचडीमध्ये फास्ट स्ट्रीमिंगसाठी फायर टीव्ही स्टिक थर्ड जनरेशन (Fire TV Stick 3rd Generation) हे ५० टक्के अधिक शक्तिशाली असल्याचं म्हटलं जातं. अलेक्सा व्हॉइस रिमोटसह ग्राहक व्हॉइस सर्च करून चित्रपट, शो पाहू शकतात. त्याचप्रमाणे, अ‍ॅमेझॉनच्या या राखी स्टोअरमध्ये ग्राहक हे फक्त ३,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. तर या सेलमध्ये इको डॉट थर्ड जनरेशन २,९९९ रुपयांना उपलब्ध करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon raksha bandhan sale discount on smart phones other products