नवीन विकसित करण्यात आलेल्या छापील त्रिमिती हृदयाच्या मदतीने डॉक्टरांनी चौदा महिन्यांच्या अमेरिकी मुलावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केली आहे. लुईसव्हिले विद्यापीठ व कोसेर चिल्ड्रेन रुग्णालय यांच्या संशोधकांनी प्रत्यक्ष हृदयाच्या दीडपट आकाराची हृदयाची प्रतिमा तयार करून त्याचा वापर शस्त्रक्रियेसाठी केला. ही प्रतिमा लवचीक वेटोळ्यांच्या मदतीने वीस तासांत तयार करण्यात आली व त्यासाठी सहाशे डॉलर खर्च आला आहे.
याप्रकरणी हकिगत अशी, की केंटुकी येथे जन्मलेल्या रोलँड लायन कुंग बावी या मुलात हृदयामध्ये चार मोठे दोष होते. डॉक्टरांना त्याचा वेध घेता येत नव्हता. त्यानंतर त्याच्या हृदयाची विस्तारित रूपातील त्रिमिती प्रतिमा तयार करून नेमका दोष कुठे व तिची प्रमाणात आहे हे शोधण्यात आले. त्यानंतर दहा फेब्रुवारीला ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
कोसेर बाल रुग्णालयाच्या रेडिओलॉडी विभागाचे प्रमुख फिलीप डायनस्की यांनी सांगितले, की सीटी स्कॅनच्या मदतीने त्या मुलाच्या हृदयाची प्रतिमा घेऊन त्याची टेम्पलेट तयार करण्यात आली व त्याआधारे नंतर त्रिमिती प्रतिमा तयार करण्यात आली. ही त्रिमिती प्रतिमा हृदयाच्या दीडपट मोठी होती. एकदा हा नमुना तयार करण्यात आल्यानंतर हृदयशल्यचिकित्सक एरली ऑस्टिन-३ यांनी लुईसव्हिले येथे शस्त्रक्रियेची योजना तयार केली. त्यानंतर अवघ्या एक तासात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. हे प्रारूप हे शस्त्रक्रिया खेळाचे नियम बदलणारे असून लहान मुलांमधील अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यास उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले. रोलँड याला शस्त्रक्रियेनंतर १४ फेब्रुवारीलाच सोडण्यात आले, त्याची प्रकृती व हृदयाची स्थिती आता व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Story img Loader