Anant Ambani Wedding Gift: अनंत अंबानीने शाहरुख खान, रणवीर सिंगला गिफ्ट केलेल्या दोन कोटींच्या घड्याळात नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या ‘या‘ लक्झरी घड्याळाचे फीचर्स

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नसोहळ्याची चर्चा वर्षभरापासून सुरू आहे. १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळी, तसेच परदेशांतील बड्या मंडळींना अंबानी कुटुंबानं आमंत्रित केलं होतं.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर

हेही वाचा… Anant Ambani Wedding Gift: अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात ‘या’ कलाकारांना दिली २ कोटींची भेटवस्तू; नेटकरी म्हणाले, “म्हणूनच एवढ्या उत्साहात…”

अनंत-राधिकाच्या या शाही लग्नसोहळ्याचा थाट काही औरच होता. भारतासह जगभरातून आलेल्या पाहुण्यांची अंबानी कुटुंबानं अगदी उत्तम सोय केली होती. पाहुण्यांना कशाचीही कमी पडू नये याची खास काळजी घेतली गेली. तसेच रिटर्न गिफ्ट म्हणून अनंत अंबानीने (Anant Ambani Wedding Gift) त्याच्या खास मित्रांना भेटीदाखल तब्बल दोन कोटींचं घड्याळ दिलं. लग्नसोहळ्यातील या घड्याळाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

दोन कोटींच्या घड्याळाचं गिफ्ट हॅम्पर (2 crore Watch Gifted by Anant Ambani)

अनंतनं त्याच्या मोजक्या मित्रांना ‘Audemars Piguet’ कंपनीचं घड्याळ भेट म्हणून दिलं. हे घड्याळ त्याच्या काही मित्रांनी घालून सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि रणवीर सिंगनंदेखील हे घड्याळ घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. एवढ्या महागड्या घड्याळात नक्की कोणते फीचर्स आहे ते जाणून घेऊ.

Audemars Piguet च्या कारागीरांनी या इनोव्हेटिव डिझायनची घड्याळं तयार केली आहेत. Audemars Piguet royal oak या घड्याळाचं परपेच्युअल कॅलेंडरचं (perpetual calendar) लिमिटेड व्हर्जन अनंत अंबानीनं खास त्याच्या २५ मित्रांना ‘रिटर्न गिफ्ट‘ देण्यासाठी बनवून घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार याची किंमत दोन कोटींपेक्षा अधिक आहे, असं सांगितलं जातंय.

Audemars Piguet घड्याळाचे फीचर्स (Audemars Piguet Watch Features)

  • या घड्याळाची साईज ४१ एम एम आहे; तर थिकनेस (जाडी)- ९९.५ एम एम आहे.
  • १८ कॅरेटच्या रोज गोल्डनं बनलेल्या या घड्याळाची डायल गडद निळ्या रंगाची आहे. या डायलचा पॅटर्न grande tapisserie असा आहे; जी घड्याळाच्या वर्जनची ओळख आहे.
  • यात सफायर क्रिस्टल लावलेले आहेत.
  • या घड्याळात गुलाबी रंगाचं इनर बेजल आहे तसंच या घड्याळात मॅनिफॅक्चर कॅलिबर- ५१३४ सेल्फ वायडिंग मूमेंटसारखे फीचर्स दिली गेली आहेत.
  • या घड्याळात १८ कॅरेट पिंक गोल्ड ब्रेसलेट एपी फोल्डिंग बकल आणि एक निळ्या रंगाचा एक्स्ट्रा स्ट्रॅपदेखील मिळतो.
  • आयकॉनिक नाईट ब्ल्यू क्लाऊट ५० रंग हा ओरिजनल रॉयल ओकची (Audemars Piguet royal oak) ओळख आहे.
  • हे कॅलेंडर घड्याळ अनेक वर्षांपर्यंत वेळ, दिवस, तारीख, महिना आणि लीप वर्षाच्या दिवसांत वाढ व घट करण्याचं कामदेखील आपोआप करतं.
  • १०० वर्षांतून एकदाच यात बदल करण्याची गरज भासते.
  • हे घड्याळ २० मीटर खोल पाण्यातदेखील उत्तम प्रकारे काम करू शकतं आणि त्यात ४० तासांपर्यंत पॉवर रिजर्व्ह करण्याची क्षमता आहे.

दरम्यान, अनंत अंबानीनंदेखील त्याच्या लग्नात ‘Audemars Piguet’च्या लिमिटेड व्हर्जनचं हेच घड्याळ घातलं होतं. रिपोर्ट्सनुसार अनंत अंबानीच्या घड्याळाची किंमत १५ कोटी रुपये आहे.

Story img Loader