राग येणे ही सामान्य गोष्ट असली तरी, ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक गोष्ट आहे. जास्त रागावल्याने देखील हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तसेच त्याचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. व्यक्ती तणाव आणि नैराश्याची शिकार होऊ शकते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, ऑफिस, शाळा, कॉलेज किंवा सार्वजनिक ठिकाणी जर कोणाबरोबर काही भांडण झाले तर अशावेळी अनेकांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. अशावेळी हातातून नको घडायला पाहिजेत अशा गोष्टी घडतात. यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे.
पण जर तुम्हाला नेहमी राग येत असेल तर समजून घ्या की तुम्ही एकाच वेळी अनेक समस्यांना आमंत्रण देत आहात, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय जाणून घेणे गरजेचे आहेत, हे उपाय कोणते जाणून घेऊ..
रागावर कंट्रोल करण्यासाठी टिप्स
१ . जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुमचे डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. असे किमान ८ ते १० वेळा करा यामुळे राग बर्याच अंशी शांत होतो.
२. जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही नेहमी खूप रागवता अशावेळी प्रथम तुम्ही तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. ज्यासाठी योग , मेडिटेशन, म्युझिक, डान्स, सायकलिंग यासारख्या गोष्टींची मदत घ्या . या गोष्टी केल्याने हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात, ज्यामुळे राग नियंत्रणात राहतो.
३ . रागावर नियंत्रण ठेवण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे फेरफटका मारणे. ऑफिसमध्ये कामाच्या ताणामुळे तुम्हाला खूप राग येत असेल तर थोडा ब्रेक घ्या आणि फिरुन या.
४ . जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्हाला आनंद देणार्या गोष्टींचा विचार करा. यासाठी तुम्ही काही मजेदार व्हिडिओ देखील पाहू शकता किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलू शकता. यामुळे राग काही वेळात कमी होतो.
५ . तुम्ही स्ट्रेस बॉलची मदत घेऊ शकता. स्ट्रेस बॉल हा एक लवचिक बॉल आहे, जो हाताने सहज दाबता येतो, त्यामुळे तुम्हालाही खूप राग येत असेल तर हा बॉल दाबा. हा बॉल खूप उपयुक्त आहे.
खूप रागावल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ परिणाम
- अति रागामुळे पचनसंस्था कमजोर होते. पोटदुखीसह अॅसिडिटी, अपचन यांसारख्या समस्यांना त्रास होऊ शकतो.
- जास्त रागामुळे अॅड्रेनालाईन आणि कोर्टिसोल सारखे हार्मोन्स वाढतात, ज्यांना स्ट्रेस हार्मोन्स देखील म्हणतात, श्वासोच्छवास आणि हृदयाचे ठोके वाढवतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो जे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते.
- स्ट्रेस हार्मोन्स जास्त असल्यास झोपेशी संबंधित समस्याही दिसू शकतात. झोपेच्या कमतरतेचा एकूण आरोग्यावर परिणाम होतो.