सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून आनंद किंवा दुःखापेक्षा राग व्यक्त करणाऱयांना मोठा प्रतिसाद मिळत असतो. राग व्यक्त करणे ही सोशल नेटवर्किंग साईट्सवरील प्रभावशाली भावना असल्याचे संशोधनातून आढळून आले. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या व्यासपीठावर एखाद्या व्यक्तीने राग व्यक्त केल्यास त्याला मोठा प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर त्याची भावना वेगाने इतरत्र पोहोचते, असे चीनमधील विबो या साईटच्या अभ्यासातून स्पष्ट झाले.
चीनमधील बीहॅंग विद्यापीठातील रुई फॅन आणि त्यांच्या सहकाऱयांनी हे संशोधन केले. विबो साईटवर करण्यात येणाऱया विविध ट्विटच्या माध्यमातून व्यक्त होणाऱया भावनांचा इतरांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास या संशोधनातून करण्यात आला. त्यामधून राग ही भावना सर्वाधिक प्रभावशाली असल्याचे आढळून आले. एखाद्या व्यक्तीने या साईटवर आनंद किंवा दुःख व्यक्त केल्यास त्याला जितका प्रतिसाद मिळत नाही, तितका रागाची भावना व्यक्त केल्यास मिळतो, असे संशोधकांना आढळले. सोशल नेटवर्किंग साईट्सवर कोणत्या स्वरुपाच्या भावनांचा वेगाने प्रसार होतो, हे या संशोधनामुळे दिसून आले.
अवघ्या चार वर्षांच्या काळात विबो साईट्वर ५० कोटी युजर्स आले असून, ते दररोज १० कोटी ट्विट करीत असतात. इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे ट्विटर वापरले जाते. त्याचप्रमाणे चीनमध्ये विबो ही साईट वापरली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा