Anjeer Milkshake Powerhouse Of Fibre : पावसाळा ऋतू सुरू झाला असला तरीही काही ठिकाणी मात्र उष्णता जाणवते आहे. तर ही उष्णता आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकते. पण, काही पदार्थ, फळे व पेये आपल्याला उत्साही राहण्यास मदत करू शकतात. असेच एक पेय, ज्याची कन्टेन्ट क्रिएटर आरती सहानीने ओळख करून दिली आहे. तो पदार्थ म्हणजे ‘अंजीर मिल्क शेक’. हे एक असे पॉवरपॅक मिल्क शेक आहे, जे पोषक घटकांनी भरलेलं आहे. तुम्हाला त्वरित ऊर्जा हवी असेल, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुमच्यासाठी कन्टेन्ट क्रिएटर आरती सहानीने अतिशय सोपी, सुपर हेल्दी मिल्क शेकची रेसिपी सांगितली आहे.

अंजीरचे मिल्क शेक कसे बनवायचे?

साहित्य :

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

२०० मिली – कमी चरबीयुक्त दूध – ८४ कॅलरीज
दोन – भिजविलेल्या सब्जाच्या बिया – ४ कॅलरीज
२० ग्रॅम अंजीर- (भिजवलेले) – ५५ कॅलरीज
१-२ भिजवून, चिरलेले बदाम (पर्यायी) – ८ कॅलरीज
इलायची पावडर (पर्यायी)

कृती –

वर दिलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक करून घ्या. अशा प्रकारे मिल्क शेक तयार करा.

एक ग्लास मिल्क शेकमध्ये एकूण कॅलरीज – १५०

प्रथिने – ७.८ ग्रॅम
फायबर – २.५ ग्रॅम
चरबी – ३ ग्रॅम
कर्बोदके – २३.२ ग्रॅम

हेही वाचा…सर्दी, खोकला झाल्यावर तुम्हीसुद्धा दूध पिणं टाळता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या खरं कारण अन् त्यावरील उपाय

उन्हाळ्यासाठी हे परफेक्ट मिल्क शेक कशामुळे बनते?

उन्हाळ्यात अंजीर खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. कारण – अंजीर हे फायबरचे पॉवरहाऊस आहे; जे पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियम, जीवनसत्त्वे यांनी समृद्ध असते आणि आजारांनाही दूर ठेवण्यास मदत करते. तसेच बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित गॅससारख्या समस्या दूर ठेवण्यासाठीही अंजीर फायदेशीर आहे. त्याव्यतिरिक्त रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही अंजीर साह्यकारी ठरू शकते, असे कन्टेन्ट क्रिएटर आरती सहानी म्हणाल्या आहेत.

याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दी इंडियन एस्क्प्रेसने धरमशिला नारायणा हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ पायल शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीसुद्धा हे उत्तम उन्हाळी पेय असल्याचे मान्य केले आहे. अंजीरचे मिल्क शेक शरीराला ताजेतवाने, पौष्टिक, हायड्रेटिंग ठेवण्यास मदत करते. अंजीरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स असतात; ज्यामुळे मिल्क शेक तुमच्या आहारात एक आरोग्यदायी भर घालते.

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या एन. एम. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबिना यांनी अंजीर शेकला उन्हाळ्यातील समस्यांसाठी एक आदर्श उपाय म्हटले आहे. कारण- हे पेय त्वरित ऊर्जा, उत्तम पोषण व थंडावायुक्त चव, असे एकाच वेळी तीन फायदे मिळवून देते, असे त्यांचे म्हणणे आहे. ”अंजीर मिल्क शेक एक नैसर्गिक गोडवा व शरीराला फायबर देते आणि सब्जाच्या बिया थंडावा आणि महत्त्वपूर्ण खनिजे शरीराला पुरवतात. भिजवलेले बदाम हा एक पर्यायी घटक आहे; जो मिल्क शेकला क्रंची बनविण्याव्यतिरिक्त आरोग्य फायदेही देतो,” असे डॉक्टर बबिना म्हणाल्या.

हेही वाचा…भातावर एक चमचा तूप घालून खाणे योग्य की अयोग्य? मधुमेही रुग्णांसाठी ठरेल का धोक्याची घंटा? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

आहारतज्ज्ञ पायल शर्मा पुढे म्हणाल्या की, अंजीरच्या नैसर्गिक गोडपणाचा अर्थ असा आहे की, आपल्याला अतिरिक्त साखरेची गरज लागत नाही. त्यामुळे अंजीराचा शरीराला निरोगी राहण्यास उपयोग होतो. त्याशिवाय अंजीर मिल्क शेक हे पेय ऊर्जेची पातळी राखण्यात व पचनाला चालना देण्यास मदत करू शकते. या दोन्ही गोष्टी उन्हाळ्यात महत्त्वाच्या असतात. अंजीर मिल्क शेकचा कूलिंग इफेक्ट उष्णतेला सामोरे जाण्यास मदत करू शकतो आणि ते एक परिपूर्ण उन्हाळी पेय ठरू शकते.

कन्टेन्ट क्रिएटर आरती सहानी यांच्या म्हणण्यानुसार, शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी अंजीर रात्रभर भिजविणे उत्तम ठरेल. अंजीर पाण्यात भिजविल्याने शरीराला ते चांगल्या प्रकारे आत्मसात करण्याच्या दृष्टीने मदत होते. फायबरचे विद्राव्य व अघुलनशील, असे दोन प्रकार आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही अंजीर पाण्यात भिजवता तेव्हा विरघळणारे फायबर तुटते आणि ते शोषण्यास सोपे जाते. प्रौढांसाठी उन्हाळ्यात दिवसातून तीन ते चार अंजीर खाणे पुरेसे आहे. दरम्यान, मुलांना फक्त एक ते दोन अंजीर खायला द्या, असे पुढे आरती सहानी यांनी स्पष्ट केले.

वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी हा पर्याय उत्तम आहे का?

वजन कमी करू पाहणाऱ्यांचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्यांसाठी मिल्क शेक हा उत्तम पर्याय ठरेल. कारण- त्यात प्रत्येक सर्व्हिंगमध्ये फक्त १५० कॅलरीज असतात. त्याशिवाय त्यात प्रथिने, फायबर, उपयुक्त चरबी, कर्बोदके यांचे संतुलित मिश्रण असते, असे डॉक्टर बाबिना यांनी नमूद केले. त्याशिवाय व्यग्र वेळापत्रक असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय बनतो; जो तीव्र उष्णतेमध्येही शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतो.

Story img Loader