उन्हाळ्यात जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यास आंबट ढेकर येणे अपरिहार्य असते, कारण या ऋतूत पोट बिघडणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पुष्कळ वेळा उलटसुलट खाल्ल्याने पोटात तीव्र वेदना होतात आणि चक्करही येते. सततच्या आंबट ढेकरमुळे हैराण व्हायला होते. अशा परिस्थितीत दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करणेही कठीण होऊन बसते. जेव्हा पोटदुखी असते तेव्हा आपण सहसा अशा गोष्टी खातो ज्यामुळे पोट थंड होते आणि पचनाच्या समस्या दूर होतात. आज आपण जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या खाल्ल्याने पोटातील आंबटपणा, अॅसिड रिफ्लक्स आणि अॅसिडिटी दूर होते.
- दही
दह्याचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळेच उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर दही खाल्ले जाते. जेवल्यावर दही खाल्ल्याने पोटात गडबड होणार नाही आणि आंबट ढेकरही येणार नाही.
- वेलची
जेवणाचा सुगंध वाढवण्यासाठी तसेच नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, एक किंवा दोन वेलची चघळल्यानंतर आणि त्यावर पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला आंबट ढेकर येण्यापासून आराम मिळेल.
Photos : रात्री लवकर जेवण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का?
- पुदिना
उन्हाळ्यात पुदिन्याच्या पानांचे सेवन करणे फायदेशीर ठरते, कारण असे केल्याने पोटाला थंडावा मिळतो. तसेच, यामुळे पचनशक्ती सुधारून पचनाच्या संबंधित अनेक समस्या दूर होतात. पुदिन्यामुळे आंबट ढेकर दूर होण्यास मदत होते.
- आले
जेवणाची चव वाढवण्यासाठी मसाला म्हणून आल्याचा वापर केला जातो, पण कच्चे आले थोडे मीठ घालून चघळले तर पोटातील अॅसिडिक गॅसेसपासून सुटका होते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)