बर्‍याचदा लोक आपली त्वचा आणि आरोग्याबाबत खूप जागरूक असतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला प्रेझेंटेबल दिसावेसे वाटते. परंतु काळपट किंवा गडद झालेले गुडघे, कोपर आणि हाताखालील भागांमुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. परंतु तुम्हाला माहित आहे का, कोपर आणि गुडघे काळे होण्याची अनेक कारणे असू शकतात. घर्षण वाढणे, हार्मोन्सच्या समस्या, त्वचा रोग इ. याची करणे असू शकतात. अशा परिस्थितीत, आज आपण काही प्रभावी टिप्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर तर होईलच पण गुडघे आणि कोपर काळपट होण्याच्या समस्येपासूनही तुम्हाला सुटका मिळेल.

  • घर्षण कमी करा

आपल्या कामात आपण आपले पाय आणि हात बराच वेळ दुमडून ठेवतो, त्यामुळे त्यांच्यात घर्षण होते. येथील त्वचा काळी होते. अशा स्थितीत घर्षणापासून आपल्या त्वचेचे संरक्षण केल्याने आपल्याला खूप फायदा होईल.

फ्लश करताना टॉयलेट सीटचे झाकण बंद ठेवावे की उघडे? संशोधनातून समोर आली माहिती

  • घट्ट कपडे टाळा

तुम्ही देखील घट्ट कपडे घालत असत, तर आजच ही सवय बंद करा. यामुळे तुमच्या शरीरात घर्षण निर्माण होते, त्यामुळे त्वचेचा काळपट होण्याची समस्या उद्भवते.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

  • व्हिटॅमिन ए आणि ई चा वापर करा

जर तुम्ही रोज व्हिटॅमिन ए आणि ई चा वापर केला, तर तुम्हाला खूप फायदे होतील. त्यामुळे त्वचेचे पिगमेंटेशन सुधारण्यास मदत होते. गाजर, रताळे, भोपळा यांसारख्या गोष्टीही यासाठी फायदेशीर ठरतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader