एखाद्या अनोळखी नंबर वरून एखादा WhatsApp वर व्हिडीओ आला असेल तर तुम्ही सावध होण्याची गरज आहे. कारण तो व्हिडीओ कदाचित व्हायरस असू शकतो आणि त्यामुळे तुमचे WhatsApp किंवा फोन हॅक होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोबाइल हॅक करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे फंडे वापरले जात आहेत. आता एमपी४ फॉरमॅटमधील एक व्हिडीओ फाईल अशीच व्हायरल होत आहे. ही फाईल हॅकरला तुमच्या फोनचा अ‍ॅक्सेस देते. त्यामुळे WhatsApp वर अनोळखी नंबरवरून आलेल्या व्हिडीओ फाईल डाऊनलोड करताना सावध होण्याची गरज आहे.

या नव्या स्पायवेअरचा धोका ‘अतिगंभीर’ असल्याचा इशारा भारताच्या कंम्प्युटर इमर्जंसी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी) दिला आहे. हॅकिंगची यंत्रणा असलेले विशेष प्रकारचे व्हिडीओ WhatsApp वर पाठवून मोबाइल हॅक करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे फेसबुकनेही कबुल केले होते.

कोणाला आहे हा हॅकिंगचा धोका..?
Android, iOS आणि Windows या तिन्ही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर अशा स्पायवेअरद्वारे हल्ले होत आहेत. हा स्पायवेअर मोबाइलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलचा संपूर्ण ताबाच हॅकरकडे जातो. मग, तुमच्या मोबाइल नंबरचा वापर करून तोच व्हिडीओ इतरांना पाठवला जातो. शिवाय तो हॅकर तुमच्या मोबाइलमध्ये इतर काही अ‍ॅप्सही इन्स्टॉल करू शकतो. त्यामुळे एखाद्या अनोळखी मोबाइल नंबरवरून WhatsApp वर आलेला व्हिडीओ डाऊनलोड करताना अनेकदा विचार करा.

कोण आहे या व्हिडीओमागे..?
WhatsApp वापरणाऱ्यांचे मोबाइल हॅक करण्याचे तंत्रज्ञान अर्थात पेगासस स्पायवेअर (Pegasus spyware) निर्माण केल्याचा इस्रायलच्या एनएसओ ग्रुपवर आरोप होत आहे. या आधीही या ग्रुपने असे स्पायवेअर तयार करून अनेकांचे मोबाइल आणि कंप्युटर हॅक केल्याचे आरोप आहेत.

मराठीतील सर्व टेक्नॉलॉजी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another spyware video targeting whatsapp mobile pd81