Kitchen Hacks: भारतात भात हा खूप आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. अनेकांना ताटात पोळी-भाजी नसली तरीही चालेल, पण भात हा हवाच असतो. शिवाय भात खाल्ल्याशिवाय काहींचे पोटही भरत नाही. असा हा खूप महत्त्वाचा पदार्थ प्रत्येक घरात दिवसातून एकदा तरी बनवला जातो. अनेक जण महिन्याचा किराणा भरताना एक महिन्यासाठी लागणारे तांदूळ विकत घेतात. पण, काही जण वर्षाचा किंवा सहा महिन्यांसाठी लागणारे धान्य एकादाच भरतात, त्यामुळे भातामध्ये मुंग्या होतात. अशा परिस्थितीत तांदळातून मुंग्या काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि वेळही वाया जातो. या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत.

तांदळाच्या डब्यातील मुंग्या पळवून लावा

लसूण

kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Toxic semen kill female mosquitoes australia
डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?
How long to boil eggs
कच्ची अंडी किती वेळ उकळायला हवी? अंडी उकडण्याची ३- ३- ३ पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का?
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
Plastic Chair Cleaning Tips
काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
No appointment of guardian minister yet Mumbai news
पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना अद्याप मुहूर्त मिळेना

तांदळात होणाऱ्या मुंग्यांना दूर करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या डब्यात न सोललेल्या ७-८ लसूण पाकळ्या टाकून ठेवा आणि तांदळात व्यवस्थित मिक्स करून घ्या. जेव्हा लसणीच्या पाकळ्या पूर्ण सुकतील तेव्हा त्या बाहेर काढा आणि दुसऱ्या घाला, यामुळे तांदळात मुंग्या होणार नाहीत.

कडुलिंबाची पाने आणि मिरची

तांदळाच्या हवाबंद डब्यात फक्त मूठभर कडुलिंबाची पाने किंवा पाच-सहा कोरड्या लाल मिरच्या घाला. यामुळेदेखील तांदळाला कीड, आळ्या किंवा मुंग्या लागत नाहीत.

लवंग आणि दालचिनी

तांदळातील मुंग्या दूर करण्यासाठी तुम्ही लवंग आणि दालचिनीचाही वापर करू शकता. यासाठी मूठभर लवंग, दालचिनी घ्या आणि ती डब्यात ठेवा. या दोन्हींच्या वासामुळे मुंग्या लागणार नाहीत.

माचीसची काडी

जर तुम्हाला तांदळाचे मुंग्या, आळ्यांपासून संरक्षण करायचे असेल तर तुम्ही ज्या डब्यात तांदूळ ठेवता, त्या डब्यात माचीसच्या काड्या ठेवा. माचीसची काडी कीटकांना दूर ठेवण्यास मदत करते.

हेही वाचा: तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…

तमालपत्र

तांदळाच्या डब्यातील मुंग्या दूर करण्यासाठी तुम्ही लाल मिरचीच्या जागी तमालपत्रही वापरू शकता. तमालपत्र कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Story img Loader